Find the Best पाऊस Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutतुमच्याकडे पाऊस आहे का, लातूर पाऊस आहे का, मुंबईला पाऊस आहे का, गारांचा पाऊस meaning in english, परतीचा पाऊस in english,
काव्यात्मक अंकुर
वृंदावन बहरुन यावा पाऊस फुलावे हे अंगण मुसळधार नको फक्त सुंदर दिसावे वृंदावन ©काव्यात्मक अंकुर #वृंदावन #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी
#वृंदावन #अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #expression #marathi #मराठीचारोळी #marathicharolya #rain #Nature मराठी कविता निसर्ग कविता मराठी मैत्री मराठी कविता पाऊस मराठी कविता छोटी कविता मराठी
read moreशुभ पडघान
भरगच्च ढगाळलेले आभाळ नुसते त्याच्यासाठी नवचैतन्याचा सण आहे...!! पाण्याची एक सर कोसळता निसर्गाहुनी हिरवळते शेतकऱ्याचे हळवे मन आहे...!! #पाऊस...!! #संजीवनी...!! ©शुभ पडघान #raindrops
Amisha Asole
मिरुगाचा हा पाऊस येताच मनात पसरल्या उल्हासाच्या गारा, पडला पाऊसाचा थेंब अन् भिजली संपूर्ण वसुंधरा !! ©Amisha Asole #पाऊस
Amita
White पाऊस💦💦 उगाच रिते का मन हे आतुर वर्षा आगमनाची लागे हुरहूर..... पाऊस येता अवखळ, अल्लड तृप्त झाले मन हे चंचल.... वलयांकित नक्षीच्या रेखा उमटून गेल्या जळात पळभर.... वृक्षवेलींवर पाचूंची उधळण अन् इंद्रधनुचे त्यावर कोंदण.... बिंदू अनामिक बुजरे क्षणभर प्रवाहात ओघळती जळात उमटले गगनाचे प्रतिबिंब धरेच्या मिलनासाठी.... उंच तरुवर भिजूनी पक्षी निवांत क्षण वेचती.... मध्येच फडफड, भिरभिर करिती थेंब शिंपण्यासाठी.... उभ्या उभ्या सरींचा जणू आरव घुमतो कानी सप्तसुरांची मैफल जमते नक्षत्रांच्या अंगणी.... ओल्या ओल्या मातीचा गंध भरतो अंतरी जणू कोमेजल्या मनाला लाभावी संजीवनी.... उमलून येई भाव मनीचे जलधारा पाहताक्षणी उमटून जाती अविरत शब्दांचे काव्य लेखणीतूनी काव्य लेखणीतूनी।। अमिता🖋️ ©Amita #पाऊस
Dileep Bhope
अंगणात माये किती पडतो पाऊस जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत.. छपरावर धारा आल्या दुडुदूडू धावत घसरंडा उंबऱ्यात धर ना माझा हात सांग वल्ली कसी गं होतील कापडं काढून सदरा इजार, घालतो लंगोट धुवून गेले रस्ते बघ झाले चकाचक सोडू दे ना नाव या वाहत्या पाण्यात अंगणात माये किती पडतो पाऊस जावू दे बाहेर, सर्दी नाही ना होत.. ©Dileep Bhope #पाऊस
Amita
छत्री ☔ एका छत्रीत असतो उभे, समांतर दोघे आपण मनात मात्र असतो कोलाहल, नवखे नसतो तरीपण.. आवडणारा पाऊसही, पेटून जातो हट्टाला कोसळताना धरणीवर, न्हाऊ घालतो मनाला.. नि:शब्द मनाचे तुषार स्पर्श करतात अलवार वाऱ्याची झुळूक जशी बटा उडवते हळुवार.. बटांकडे रोखुन बघण्याचे धाडस काही नसते भावनांच्या अशा खेळात वाचाही कुठे फुटते? ती वाट बघते पाऊस रिता होण्याची आर्जव मी करतो वीज कडाडण्याची..🌩️ वाटतं एखादा फक्कड चहा छत्रीत मिळून घ्यावा पण तिच्याही मनात असेल का प्रेमाचा अबोल ओलावा.. भावनांचा हा लपंडाव असाच सुरू असतो पाऊस थांबताक्षणी छत्रीतला प्रवास संपतो.. राहतात त्या स्मृती, हृदयातील कप्पा अडवून उफाळून कधीतरी येतात सरींसारख्या उसळून.. अमिता ©Amita #पाऊस
Dileep Bhope
दाटले आभाळ तेव्हा व्हायचे होते पाऊस मनात माझ्या काय ते होते तुलाच ठावूक ©Dileep Bhope #पाऊस
Dileep Bhope
🌧️⛈️🌩️ 🌴 भिजवून नखशिखांत वाहून जाणे धर्म ज्यांचा, त्या जय पराजय नाही ढगातीत वादळाची रोज वाट पाहे या पावसाचे ना सरले वय काही! #दिबाभोपे ©Dileep Bhope #पाऊस
Amita
भिजून गेले अंगण 💦 भिजून गेली काया वृथा असे का व्यथा विखुरला मृद्गंंधाचा फाया.... अमिता ©Amita #पाऊस #मराठीचारोळी #मराठीलेखणी
#पाऊस #मराठीचारोळी #मराठीलेखणी
read more