Nojoto: Largest Storytelling Platform

New आयुष आयुष Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आयुष आयुष from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष आयुष.

Stories related to आयुष आयुष

शब्दवेडा किशोर

White माहित नाही मज..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही मजला काहीच 
की काय माझं उद्याचं स्वरूप असेल 
जिवंत ठेवणारी सारी सुखं लाभतील मला की
माझ्या गळा तो चंदनटिळ्याचा मोतिहार असेल  ||१|| 
शापित या जोकराला नव्या जन्मात तरी सुख मिळेल की 
आहे जुना वारसा त्याच्या ललाटी लिहिलेला
त्याच जुन्या वाटेचा मी नव्याने वारकरी झालेला असेल   ||२||

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White  सावरले घरटे मी....
शब्दवेडा किशोर 
सावरले घरटे एक एक काडीचे मी सदा अश्रू टिपत
मनीच्या हजारो वेदनेच्या आसवांना हळुवार पुसत
सतत जगलोय मी मनाची एकेक भिंत ढासळताना बघत
जिथं आलोय जन्माला त्यांनीच लाथाडले मजला
अन् मानले ज्यांना आपले जेव्हा ते आपलेच मजला सोडून गेले
रक्ताच्याच नात्याची लोकं सदा घरट्यातून अलगद मजला 
मजपासुनच दूर तकर राहिले
सदा तुटलेले पंख लावुन माझ्या भाळी 
मीच ते विरलेले बंध नात्याचे जोडून होते ठेवले 
मीच नाती जपून ढासळलेल्या घराची 
एक एक वीट रचून सावरले जेव्हा सारे 
तेव्हाच मजला बेसावध असताना मृत्यूने कवटाळले
मग सोडून जग सारे माझे इथेच राहिले
मोहातलेचं होते का दुरावे क्षणभंगूर आयुष्य
क्षणात संपणारे सारे सत्य नात्याचे मजला नाही कधी उमजले....

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

माझं नशीब इतकं खराब झालंय की
जर मी एखादी स्मशानभूमी जरी
राखायला घेतली
तर माणसं मरायचीसुद्धा
बंद होतील..
शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर

शब्दवेडा किशोर

White तो वरचा देव असे पायलट..
शब्दवेडा किशोर 
माहित नाही रंग रुप काही
माहिती नाही स्वभाव खास त्याचा
तरीही आपण ठेवतोच ना विश्वास
आपल्या आयुष्य नामक
विमानाच्या पायलटवर कायमचा........   ll१ll
तिकीट काढून बसतो या आयुष्य नावाच्या विमानात
पण आयुष्याच्या प्रवासाबद्दल नसते काही माहिती
तरीही असते ना खात्री त्याबद्दल
नसते कुठली चिंता किंवा भिती........     ll२ll
नाही वाटत कधीच कुठलीच काळजी
किंवा नाही घेत कुणीही कधीच कुठलीही शंका
निर्धास्तपणे बसतो विमानात मात्र
असतो त्याबद्दल विश्वास पक्का........    ll३ll
असाच ठेवुया दृढ विश्वास आपण सदा 
अशीच ठेवु त्या परमेश्वरावरही श्रद्धा
सहजपणे जगु आपण जीवन मग
नाही होणार आपल्याला कधीच कुठलीही बाधा........   ll४ll
करत रहातो आपण सतत चिंता काळजी
भूत भविष्याची जीवनात आपण
का नाही ठेवत देवावर श्रद्धा भाव
तोच भवसागरातून नेईल तारुन........     ll५ll
जगाचा सोडावा विचार प्रत्येकाने
स्वतः वर प्रेम करावे फक्त आपण
मात्र देवावर हवी श्रद्धा भक्ती पूर्ण
मग तरंगत राहु आनंदात सर्वजण........    ll६ll
जसा ठेवतो आपण त्या विमानाच्या पायलटवर विश्वास
तसाच विश्वास असला पाहिजे आपला त्या परमेश्वरावर
मग नाही करायची कधी काळजी कसलीच
तो नेईल बरोबर आपल्या आयुष्याला सन्मार्गावर........   ll७ll

©शब्दवेडा किशोर #आयुष्याच्या_वाटेवर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile