Find the Latest Status about शेतकरी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेतकरी कविता.
Dipakraj Surywanshi
दुष्काळ ग्रस्त शेतकरी शेतात पिकाची लागवड केली. जून महिना गेला आता जुलै संपत आला. अन् तुझे अजुन ढग फुटले नाही.. येन पावसा आता तरी.. पक्षाची किलबिल बंद झाली. घरटे सारी खाली झाली.गुरे ढोरे हिरवा चारा पाहू लागली..येन पावसा आता तरी.. शेतात लागलेलं बीज इवल इवल वरती आलं पण पाण्याचा अन उन्हाच्या पाइ तेही माना खाली टाकु लागलं डोक्यावर सावकाराच्या कर्जापाई हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहे येन पावसा आता तरी... असच चालत असलं तर शेतकरी कोणी होणार नाही. सर्व जातील शहरी भागात अन्नधान्य भेटणार नाही येन पावसा आता तरी... सरकारची साथ नको हवी आम्हाला. कारणसरकारलाच आम्ही पोसत आहो. साथ हवी ती फक्त तुझी. येन पावसा आता तरी... कवी:- दिपकराज सुर्यवंशी दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.
दुष्काळ ग्रस्त शेतकरी.. कविता.
read moreIshwar Vaybhat
शेतकरी शेती - शेती करतो बळीराजा तो जीव की प्राण माझा त्या भेगाळल्या भुश्च्या || भुरच्या भेगा त्यासाठी पावसाकडे भिक मागा अपनी अनवानी पायाने तुडवी शेतातले काट पायात नाहीत बुटे लावून स्वतःच्या घरात कष्टाची वात काम करी जगासाठी दिवस-रात मारून नसीबाला गाट घरीली भविष्याची वाट. ©Ishwar Vaybhat शेतकरी कविता #farmer #शेतकरी #फार्मर #गरिबी #viral #Like #Comment
उमा जोशी
तो राबराबतो शेतामध्ये फार अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार बीज पेरलेले वाया जाते सारे पण गडी कधीही मानत नाही हार थांबून राहणे माहित नाही त्याला अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला रोवून घट्ट तो पाय उभा मातीत कामास सज्ज जोडून बैलजोडीला राबतात त्याच्या कुटुंबातले सारे झेलतात सगळे अंगावरती वारे थकतो जीव तरी थांबत नाही कोणी डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे भाव मिळत नाही इतके करून त्याला तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या कष्टाने तो सावरतो आवेगाला सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना? एवढा करा की विचार जाता जाता --- ३१/०७/२०२३ ©उमा जोशी #शेतकरी
Sanika Gaikwad
#शेतकरी राजा 👑 तू लेक काळया मातीचा मर्द रांगड्या छातीचा पोशिंदा तू जगाचा मानकरी तू कामाचा कष्ट नशिबी तुझ्या फक्त पेरायचंआणि काढायचं तू नुसत घामाचं शून्य मोल तुझ्या बेभाव जातो माल निसर्गाचा समतोल बिघडला की होतात तुझे हाल अंधाऱ्या राती सोबतीला विंचव आणि साप तरी दुसर्याच्या हाती तुझ्या किमतीच माप सर्जा राजाची नादर गाडी तुझी वेगळाच थाट राबतोस कळ्या आईसाठी म्हणूनच देशाचा कणा आहेत ताट ©Sanika Gaikwad शेतकरी
शेतकरी #मराठीकविता
read moreDipak Khekare
शेतकरी माझा बाप शेतकरी बाप माझा राबे राणा वनात नाही त्याच्या पोटी तूप रोटी साखर खातो चटणी भाकरी चालवितो नागर माझ्या बापाची मात्र नाही कुन्हा रे कदर... अंगावरी ऊन घेऊन चाले अनवाणी पायांनी वाट सजली होती काट्या काळ्या गोट्यानी त्यांच्या अंगावरील सदरा फाटक फुटका त्यांच्या नशिबी मात्र ऊन वाऱ्याच्या आसरा खाऊन चटणी भाकर राबे दिवस रातर खांद्यावरी रे नांगर जसा नभात इंद्रधनुष्य अंगावरी घाम त्यात इंद्रधनुष्याचे रंग त्या रंगानी सजले माझ्या बापाचे रे अंग कधी भेटणार भाव शेतकऱ्याच्या मालाला सांगे हमी भाव देऊ मग चुकते कशाला आम्ही आहो दानादिन म्हणूनच ही गत्ती एकवटूनचं आलो तर होईल तुमची सुट्टी पण एकत्र होण्यात भ्रष्ट आमची बुद्धी आता तरी एकत्र येवून लढूया एकमेकांचे सारथी आपण बनुया..... दिपक खेकारे खिर्डी,चंद्रपूर-८८८८३२४१५६ शेतकरी
शेतकरी
read moreSachin Zanje
जग पोशिंदा.. ठाऊक नाही जगास आम्ही काय करतो. शेतकरी आहे असं म्हटलं कि, गरीब, लहान वर्गीय,हया नजरेने समाज आम्हास पाहतो. ज्या शेतात आम्ही राबतो त्यावर भारत देश माझा जगतो. सरकारी नोकरीचा नादी न लागता त्याचा मुलगा देशासाठी ताठ मानेनं सिमेवर लढतो. अभिमान गर्व करू नका तुमच्या नोकरीतील भरमसाठ पैशाचा. घरच्या जेवणाशिवाय पोट भरत नाही ते कुठून येते विचार कर त्या अन्नाचा. कंपनी ,उद्योगांमुळे झालो आम्ही मालोमाल. त्याच कंपनीला कच्चा माल तयार करण्यासाठी किती होतात माहीत आहे आमच हाल. अशा अनेक लिहायच्या आहेत कथा. त्यात कळेल माझ्या शेतकरी राजाची व्यथा. धन्यवाद कवी - कु सचिन सदाशिव झंजे. शेतकरी
शेतकरी
read more