Find the Latest Status about मनातील भावना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनातील भावना.
D S
पाऊले डगमगली की आधार तुमचा मिळतो मनी भीती दाटली की कुशीत तुमच्या निजतो कौतुकाचा वर्षाव झाला तरी तुमच्या शब्बासकी साठी आतुरतो तुमच्या चेहर्यावर हर्ष पाहून आम्ही मात्र आनंदाने बहरतो चुकले-माखले तर ओरडता तूम्ही डोळ्यातील पाणी अलगद पुसतात तुम्ही गोड-गोड चॉकलेटचा लळा तुम्ही लावतात कधी-कधी चुकीच्या हट्टा पायी चापट तुम्ही मारतात कधी कणखर तुम्ही तर कधी प्रेमाचा झरा तुम्ही तुम्हाला समजून घेणे आहे कठीण देवाला समजण्यासाठी देवपण आणू आम्ही कोठून!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
गिनती गई हजारो में , ऐसे लाख मत होने दो, रहो अपने घर में अपने देश को बेचिराख मत होने दो !!! Stay home🏡be safe😷 मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
सोनचाफ्याची सोनपरी तु .. सोनसकाळी ... कानी पैंजणाची झंकार पडली.. नकळत छेडली हृदयाची तार ... तुझे अल्लड हसणे ... तुझे नजर चुकवून पाहणे... तुझे काळजावर घाव घालणारे.. लाजणे... तुझी हरणीपरी चाल ... कोकिळापरी मधुर वाणी... क्षणभर गोंधळलो... तुझ्या सौंदर्या परी... आज चंद्र ही लाजला... तुझ्या लाजर्या परी ... तुझ्या अदा वर झालो फिदा... सोनचाफ्याची सोनपरी तु!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
भावनांचा कोंडमारा होऊन... दम घुटल्या गत भासले की??? समजून घ्यावे की ??? भावनांना पाझर फोडण्याची अचूक वेळ आली आहे!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
टाळ,मृदुंग,हाती वीणा मुखी अभंगाची वाणी... तुझ्या सावळ्या रूपात गुंतले तुझ्या चरणी मी झुकले... चंद्रभागेत नाहले तुझ्या भक्तीत मी वाहिले ... तुझ्या जयघोषात रंगले भक्तीच्या सागरात मी दंगले... अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अंत:करणानी केली तुझी सेवा... तुझाच हेवा,तुझाच ठेवा मजला भाव अंतरी भक्तीचा पुजला !!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
कित्येकदा जाणूनबुजून मनाच्या हाकेला साद घालणे टाळते . असंख्य प्रश्नांना डावलते. भावनारूपी मनात भावनांचे तोरण सजलेले असते. अगदी निरागस भावना असतात. तरी बुध्दीच्या अधिराज्य पुढे निरागस भावना पूर्णत्वास नेणे कठीण असते . अगणित मौल्यवान भावनां पासून खोटे बहाने शोधून पळ काढतो .पळ काढला तरी... मनाच्या तळाशी भावनांची साठवण असते. अवचित पणे कधी मनाचा तळ गाठला जाईल. याचा काही नेम नसतो. एकांतात आठवणीं संघे दमछाक झाली की... डावललेल्या भावना आणि आठवणी नयनांतुन अलगदपणे आसवांच्या रूपाने ओघळतात. तरी देखील मनाला मागे सोडून बुध्दीच्या मागे धावणारे आम्ही...... सरतेशेवटी ओंजळीत तडजोड घेऊन आयुष्य काटतो!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
तु चंद्र अन् मी चांदणी, तु प्रेम वेडा कृष्ण अन् मी तुझी राधा, तु विटे वरील सावळा विठ्ठल अन् मी तुझी रुक्मिणी, तु खळखळणारा समुद्र अन् मी शांत किनारा, तु भर उन्हातील पावसाच्या सरी अन् मी तृप्त माती, तु चोहीकडे भिरभिरणारा भुंगा अन् मी बहरलेला चाफा, तु सरोवराच्या काठा ची हिरवळ अन् मी त्यावरील दवबिंदू, तु प्रेमाचा सागर अन् मी तुझ्यात सामावणारा झरा!!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
पुन्हा तेच तसेच... अंधारलेली रात्र... मनाच्या गाभाऱ्यात... गडद काळोख... आठवणींचे बरसणे... पापण्यांचे भिजणे... अगदी तसेच... पुन्हा तेच तसेच!!! .......Dip मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
जेव्हा तु माझ्या वर रागवून... तुझे गोरे-गोरे गाल लाल-लाल करते ना ?? तेव्हा तो रंग जास्त शोभतो तुझ्या वर !!! मनातील भावना
मनातील भावना
read moreD S
ज्यांना कळते... भावनांचे गांभीर्य.... तेच खुलवतात कागदाचे सौंदर्य!!! मनातील भावना
मनातील भावना
read more