Find the Latest Status about समाधानी कसे राहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाधानी कसे राहावे.
Sujata Bhalerao
नुसत्या नको आणाभाका नकोत नुसत्या शपथा जीवनभराची साथ हवी शेवटपर्यंत विश्वास हवा मी तुला अन् तू मला सावरु संकटसमयी उज्ज्वल करु भविष्य संगतीने आपण दोघेही ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
हो मोकळी मनाने हितगुज सांग मनीचे.. नको घाबरुस आता सारी खोल गुपिते.. हा खेळ सावल्यांचा अविरत चालतो आहे.. चाचपडू नको कधीही चाल पुढे निर्धाराने.. या निष्पर्ण वृक्षांनाही पालवी फुटते नव्याने.. मग तूच थांबतेस का गं भर ओंजळ नवऊर्जेने.. जग आता स्वाभिमानाने जग तू नवविचाराने.. ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
नतमस्तक होऊनी चरणी लीन व्हावे... अन् तथागतांप्रती हृद्य भावगीत गावे... मूलमंत्राची शिकवण अत् दिप भव मज ठावे... साऱ्यांचे होईल मंगल हा आशिष देत जावे... 🙏💐 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे #गातच राहावे
#जीवनगाणे #गातच राहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
ही कातरवेळ जीवघेणी तुझ्या डोळ्यातील भय बरंच काही सांगतंय..... समाजव्यवस्थेचा चक्काचूर नाही सुधारणार का कुणी ? सुरक्षा गेली उडत.... काळोखी रस्त्याचे भय मदतीसाठीची आर्त किंकाळी भेदून जाते काळजाला.... तरीही थांबत नाही काही तूही धीटाईने सामना कर कारण लढाई एकटीची आहे 😌 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीविचार
read moreSujata Bhalerao
कधीच नाही कंटाळा कधीच नाही आळस फुलतेस अविरत कायम टवटवीत असो कोणताही ऋतू नाही पडत कोडे कळी हळूच उमलते अन् फुले सदाफुली सदाबहार शिकवतेस सार जीवनाचे शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय हो ? सर्वांना आनंद देत सदा फुलणेच ना ! ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीकविता
read moreDileep Bhope
घडवायच्या दंगली, पेरायचे पैसै बोलायचे खोटे, मिळवायची मते गावोगाव सारे कसे, खरे चाललेले! वाकडी कधी तिरपी, चाल बेरकी बेरीज फायद्याची, वजा माणुसकी सौद्यावर सौदे, तसे बरे चाललेले! कुणी भाजले जळाले, कोण पळाले कोणास पाळले, कोण गळाले पर्वा नाही, पण बरे चाललेले! रोज चढाई बढाई, एकमेकास बधाई स्वस्तात लढाई, सांगा कुठे महागाई? रात्रंदिन गात अंगाई, बाळ झोपलेले! उचला याला त्याला, बंदी घाला माणसांचा खुला सोपा व्यापार झाला लाचार थोडे, बाकी बरे चाललेले! गावोगाव सारे कसे खरे चाललेले! ३०/३/२३ ©Dileep Bhope #गावोगाव सारे कसे खरे चाललेले!
#गावोगाव सारे कसे खरे चाललेले! #मराठीकविता
read more