Nojoto: Largest Storytelling Platform

New मजेशीर कोडे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मजेशीर कोडे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मजेशीर कोडे.

Stories related to मजेशीर कोडे

    LatestPopularVideo

Vrishali G

कोडे

read more
गुलाब माझ्या हृदयी फुलला
रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला
शुल तुझ्या उरी कोमल का
मद्याचा मी प्याला प्यालो
प्रिये तयाचा मद तुज आला
जखडीले कुणी दोन जीवांना
मंत्र बंधनी केवळ का
कुणी कोडे माझे उकलील का? कोडे

somnath gawade

#कोडे

read more
तुझं असं रूप पालटणं
कधी अदृश्य होणं 
मला कोड्यात टाकतं
हे बरोबर नाही #कोडे

somnath gawade

#कोडे

read more
चर्चेअंती कोडे सुटले होते;
मला जे कळले ते तुला कळले होते.
तुझ्या मनीचे शब्द माझ्या ओठी रुजले होते;
सरतेशेवटी आपले सर्व गुण जुळले होते.


 #कोडे

Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही.....
By Dharmendra Gopatwar

जीवनाचे कोडे सुटता सुटत नाही
माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही ...,

आतून पोखरलेली मने त्यांची ,
चेहऱ्यावर मुखवटे घालून फिरतात 
दिसेल कुणी आपले की चेहरा मागे फेरतात ....

स्वार्थाचा बाजार आहे सगळा
नात्याला पैशाने तोलतात ....
हृदय शून्य झाला आहे 
मनुष्य इथे....
नुसता शरीर घेऊन फिरतोय .....

ईश्वराला मानत नाही 
माणसाला जाणत नाही ,
राक्षसी वृत्ती काही केल्या मिटत नाही ....

दुखावलेल्या माणसाला इथे दिलासा कुणी देत नाही....
तड-फडत्या माणसाला बघून 
कुणाच्या अश्रू डोळ्यांत येत नाही....,
पाय कुणाच्या मदतीला धावत नाही 
तुटलेल्या माणसाच्या 
पाठीवर हात कुणी फेरत नाही....

डोळे वाईट बघण्यास अतुरलेले असतात ,
चुकी नाही माणसांची , काळ बदलला आहे ,
कोण कुठे कधी बदलतो याचा काही नेम नाही 

काही लोक बोलून दाखवितात..... ,
तर काही मुकाट्याने खूप काही शिकवून जातात 

माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात....
अक्षरशः 
माणसातला माणूस मेलाय याची जाणीव करून देतात...

माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही .......
कोडे जीवनाचे सुटता सुटत नाही.......

YT/कवी_मन (मनातलं ओझं पानावर)

Author

©Dharmendra Gopatwar #जीवनाचे कोडे

Nisha Dange

जातीपातीचे कोडे सुटेल काय? #poem

read more
जातीपातीचे कोडे सुटेल का?

एकच असे विश्वविधाता
निर्मिली त्याने एक मानवजात
एकाच ईश्वराची आपण लेकरे
तरीही हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई
कधी विभागलो कळलेच नाही.....
सर्वांच्या अंगी सळसळतो
फक्त लाल रंग
तरीही फडकतो वाऱ्यावर जातरंग
कुठे गेली ती भारतीय संस्कृती?
विविधतेत एकता जपण्याची
स्मरावा गौरवशाली इतिहास
क्रांतिकारांच्या गळ्यातील फास
जातीय दंगलीसाठीच का त्यांनी....
दिले आपले बलिदान?
जागवा स्वमनाला 
नि विचारा प्रश्न........
खरा तो एकचि मानवधर्म
मनामनात दरवळेल का?
आतातरी जातीपातीचे कोडे सुटेल का?
चला माणुसकीची ज्योत पेटवू 
मनांनात मानवसेवा रुजवू
असू देत कितीही......
वेगवेगळे रंग, वेश, भाषा,
तरीही नांदावी मनी नित्य
देशभक्तीची अभिलाषा 


निशा डांगे
पुसद जातीपातीचे कोडे सुटेल काय?

Vilas Bhoir

❤ तुझ्यामाझ्या प्रेमाचे कोडे! ❤

read more
*तुझ्यामाझ्या प्रेमाचे कोडे !*

तुझ्यामाझ्या प्रेमाचे गणित मलाही ठाऊक नव्हते ,
विखुरलेल्या नात्याचे कोडे सुटता सुटत नव्हते

मनातले तुझ्या द्वेष निराळे मलाही नेहमी छळते ,
बावरे प्रेम होते वेडे भांडण कधी झालेच नव्हते

भेटणे तुझ्यामाझ्यातले रंगात मलाही रंगवित जाते ,
 सोनकेशरी रंगसोहळे तरी प्रेम रंगात रंगले नव्हते 

तुच तुझ्या डोळ्यात जीवापाड मलाही जपले होते ,
म्हणून कदाचित हे प्रेम भाबडे तुलाच शोधत नव्हते

अल्लड तुझ्या वळणावरती शोधून मलाही सोबत नेते ,
अवतीभवती फिरून सारे क्षण प्रेमाचे आठवत नव्हते 

पैंजण तुझ्या पायातले हलकेच मलाही साद घालते ,
गुणगुणतांना प्रेमगीत मी तुझेच अंतरास अंतर नव्हते
 

                                       *~विलास भोईर ~* ❤ तुझ्यामाझ्या प्रेमाचे कोडे! ❤

Bharat Bandiwadekar

मजेशीर पक्ष्याचे सुंदर शॉर्ट व्हिडिओ #जीवनअनुभव

read more

Bharat Bandiwadekar

गावातील लग्न,लग्नातील धमाल मस्ती,लग्नातील मजेशीर गोष्टी #मराठीप्रेम

read more

काव्यात्मक अंकुर

कोडे अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 twoliner complicated wordporn writeaway lovequotes Love thought

read more
कोडे

कोडे हे विचारांचे भावनांना गुंतवत राही
नकळतपणे निर्मित झालेल प्रेम स्वस्थ बसवत नाही

©अंकुर
#काव्यात्मकअंकुर🌱 #कोडे #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 
#twoliner #complicated #wordporn #writeaway #lovequotes #Love #thought

Dharmendra Gopatwar

#Flute कोडे जीवनाचे ,सुटता सुटत नाही , माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही... #जीवनअनुभव

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile