Find the Latest Status about व्हावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, व्हावे.
अल्पेश सोलकर
असेही एकदा व्हावे... तूही मला चोरूनी पहावे..! तुझ्या ही मनी.. माझे तुझे स्वप्न रंगावे...! हेच स्वप्न आयुष्यभर.. आपल्यासोबत नांदावे...! असेही..एकदा व्हावे..!
असेही..एकदा व्हावे..!
read moreroshan
तिचा आज व्हावे तिची याद म्हणजे नदीचा किनारा कुणी पास नसता जवळचा निवारा मग हलकेच वाहे सुगंधात वारा त्यात ओळखीचा कवडसा गवसावा दिसेनाशी होता तिने मागे पहावे उंबर्यात अश्रूंनी मग मागे फिरावे पाऊल उचलून प्रवाहात उतरावे सोडून किनारा तिचा आज व्हावे रोशन देसाई 29.03.20 तिचा आज व्हावे
तिचा आज व्हावे
read moreyogesh atmaram ambawale
सशक्त व्हावे,सक्षम व्हावे, कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हावे.— % & सशक्त....सक्षम.. #yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार सशक्त व्हावे,सक्षम व्हावे, कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव
सशक्त....सक्षम.. #yqmarathi #yqtaai #सशक्त_नारी #सक्षमपारंगत #मराठीविचार सशक्त व्हावे,सक्षम व्हावे, कौतुक वाटावे कुणालाही,ऐसे विलक्षण व्हाव
read moreप्रकाश साळवी
श्वास माझे गीत व्हावे ! ------------------------ वृत्त : मनोरमा ----------------- जीवनाचे मीत व्हावे श्वास माझे गीत व्हावे ** ना कधीही हार व्हावी नेहमी तू जीत व्हावे ** प्रीत काही बंध नाही हेच का ते रीत व्हावे ** गीत माझे तूच आहे हे असे रे नीत व्हावे ** जीवनाचे गीत माझे जीवनाचे फीत व्हावे ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 श्वास माझे गीत व्हावे !
श्वास माझे गीत व्हावे !
read moreTitkare Pratiksha Sadashiv
पुन्हा नव्याने तु भेटावे नकळत सामोरी तु यावे असुनही अनोळखी नाते जुनेच वाटावे असेही एकदा व्हावे... आज कवितांचे तु माझ्या शब्द बनुनी यावे निरागस भाव मनीचे माझ्या तुझ्यारूपी पानावर उमटावे... असेही एकदा व्हावे... बोलता बोलता बोलणे अपुरे रहावे पुन्हा भेटण्यास नवे बहाणे मिळावे मग वाट धरण्यास माझी तुझ्या पावलांनी थोडेसे वळावे असेही एकदा व्हावे... -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे ©Titkare Pratiksha Sadashiv असेही एकदा व्हावे... #Light
असेही एकदा व्हावे... #Light
read moreManish Jadhav
व्हावे एवढे लहान.... मला आठवतंय माझं बालपण कोणाला आहे गरज, कोणाला हवीय मदत कोण आपलं कोण परक.. अस काही नसतंच मनी या सर्वांचे होऊ आपण उतराई.. मदत करताना नसावा मनी मान..व्हावे एवढे लहान... 4 - 4 कागदाच्या होड्या माझ्या मालकीच्या पाण्यात असायच्या.. एकाच दिवशी सगळं नष्ट व्हायचं.. तरी मात्र बिनधास्त झोपायचो.. सगळं मिळालंय ते हा कधीही घेऊन जाईल.. याच असावं भान.. व्हावं एवढं लहान... सगळं जिंकण्यात मज्जा खूप होती... त्याचसोबत माझा "गोट्या" मित्र मागे राहता कामा नये.. असावं सगळं बेस्ट.. कारण मिळेल आईचा रुपया थेट.. या जगात सगळं काही जिंकताना आईचा रूपया ची किंमत घसरू नये याची असावी जाण.. व्हावे एवढे लहान... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे व्हावे एवढे लहान.. #व्हावेएवढेलहान चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे व्हावे एवढे लहान.. #व्हावेएवढेलहान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
सुख दुःखाचे शब्द पेरावे हे जगणे गाणे व्हावे आनंदाचे तराणे व्हावे... जगणे असे लयबद्ध राहावे, आपुलकीचे साज छेडावे सूर तयात प्रेमाचे राहावे... प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे..
प्रियजनहो, सुप्रभात कसे आहात? आपलं जगणं हे स्वच्छंदी गाण्याप्रमाणे व्हावं... ही कविता पूर्ण करा हे जगणे गाणे व्हावे, आनंदाचे तराणे व्हावे.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #६५
read more