Find the Latest Status about आपुले जगणे आपुली ओळख from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपुले जगणे आपुली ओळख.
somnath gawade
सरणावर मला ठेऊन जाळण्यास ते आतुर होते; जे मानले आपुले ते तर सारे फितूर होते. #आपुले
Sapankar Sir
#जगणे! दुनियेच्या या बाजारात सुखासीन झालो असतो जर मी थोडासा लाचार झालो असतो. विकून मी स्वाभिमानाला सुखाचे घोट प्यालो असतो माझ्याच नजरे मध्ये नक्कीच उतरलो असतो. घोळला असता गोंडा इमानदार ठरलो असतो अस्तित्व माझे मीच विसरून गेलो असतो. चाटले असते तळवे उच्च पदी बसलो असतो राजाच्या दरबारातील विदूषक दिसलो असतो. स्वाभिमानी पूर्वजांचा गुन्हेगार ठरलो असतो पाठीचा कणा मोडून जर मी जगलो असतो! ©Sapankar Sir जगणे...
जगणे... #मराठीविचार
read moreTeja
हसऱ्या चेहऱ्याचे आहोत आम्ही धनी जरी केली असेल नशिबाने थट्टा पूरी जगण्या पाठबळ नसे ना उरी पण जगायचे च आहे मस्तकलंदरी उठ सुठ पैशाचा माज नाही आमच्या पदरी आभाळ घेतो उशाशी अन ही मातीच आहे आमची गोधळी नाही कसली भ्रांत अन नाही कसली काळजी बस जगण्यासाठी घेतो आम्ही उंचच उंच भरारी... ©तेजस्वी खेडकर #जगणे
Dileep Bhope
भेटली होती एकदा जरी पुन्हा कधी विसरायची नाही नात्यांपलिकडेही असते वेड्या एक ओळख "माणुसकी!" //दिबा// ©Dileep Bhope #ओळख
somnath gawade
तुला पाहण्याआधी शब्दांतून ओळख झाली होती; पाहता क्षणी तुला शब्दांची ताकत पटली होती. #ओळख
somnath gawade
बेताल 'वक्तृत्वा'पेक्षा उत्तम 'कार्यकर्तृत्वा'ने मिळवलेली ओळख फार काळ टिकते. ओळख
ओळख
read moreकवी - के. गणेश
कर्तव्यापासून भावनांची कधीतरी फारकत असावी, अन् मनासारखं जगायला स्वतःचीही हरकत नसावी.! @kganesh जगणे मनासारखे..
जगणे मनासारखे..
read more