Find the Latest Status about जीवनाची शायरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाची शायरी.
Trishila Salve
*नाही आठवत आता* नाही आठवत आता सांजवेळ चर्या भेटी निस्तेज होत जाणाऱ्या तेजोनिधीसह दुसरं झालेल्या सांजवेळच्या आठवणी... उगाच नको आता संवेदनेची ती शिरशिरी थंडावत चालली सांजवेळच्या प्रितीची कहाणी... नकोच आता सख्या सांजवेळच्या प्रवासाची पर्वणी ओझरत्या स्पर्शातूनही भळभळेल विरहाची जखम पुराणी.. प्रा.त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८/९११२८५९६६९ जीवनाची कविता#
जीवनाची कविता#
read moreTrishila Salve
सकाळीच गच्च भरलेल्या आभाळाची आणि माझी झाली नजरानजर... त्याने ओळखले मनातील इप्सित आणि त्याच्या सहस्त्र अश्रुंच्या धारात... चिंब चिंब केलयं मला... आभाळाच्या मिठीच्या आवेगाने समजलयं रे... रात्रभर तो तुझ्यासह विरहात जागला होता... आता फक्त तुझा निरोप द्यायला आला होता... फक्त तुझा निरोप द्यायला आला होता... त्रिशिला साळवे कविता जीवनाची
कविता जीवनाची #poem
read moreTrishila Salve
*आठवतयं तिला आज* आठवतयं तिला आज सुरुवातीला किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू... ओघवतेपणाने... मांडायचीस तिची वेदना... दर्दी शब्दात... कनवाळू अक्षरात... प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं... कारण ती इथून तिथून सारखी ना...! थोडीशी हळवी... मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची... कधी तुझी प्रेयसी बनून... कधी तुझी सखी बनून... कधी तुझी प्रीत बनून... कधी तुझी बहीण बनून... कधी तुझी आई बनून... आणि तुही आणायचासं आव आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा... उधळाचास शब्दांची फुले... बांधायचासं अक्षरांची तोरणे... त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग... अन नजाकतीने पेश करायचास... तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता... आणि घ्यायचास टाळीवर टाळी... प्रत्येक उच्छवासावर... त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व, श्रेष्ठ कविपद... स्त्रीवादी कविपद... अन बदलास तू... तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ... तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी... तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी... तिची स्त्रीसुलभ भावनाही टाळीसाठी तू लिहलेली... आता तुझी कविता ती वाचत नाही... त्यात ती स्वतःला शोधत नाही... शब्दाला दाद देत नाही... आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...? तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री... तुला प्रसिद्ध करणारी... त्रिशिला साळवे ९११२८५९६६९ कविता जीवनाची
कविता जीवनाची #Music
read moreAkshay Tayde.
शब्द जुनेच आहे, तरी गीत नवीन बनते आहे वाट जुनीच आहे, पण वाटसुरू नवीन भेटत आहे माणुसकी जुनीच आहे, परी अर्थ तिचा नवीन वाटत आहे कशी रे जीवना विटंबना तुझी कोणी जीवनदान देत आहे, कोणी जीव घेत आहे. विटंबना जीवनाची
विटंबना जीवनाची #poem
read moreTrishila Salve
*एक उसासा...* आयुष्यात अवचित वळणावर काही रस्ते एकत्र येतात... आणि त्याच वळणावर विलगही होतात... नाही रहात रस्ते एकत्र नियतिच्या आघाताने... नाही जुळत पायवाटा नशिबाच्या फेऱ्याने... नियती,नशीब सोबत आले की कधी खूप मिळतं... आणि नियतीनं,नशिबानं साथ सोडली की सगळचं उद्ध्वस्त होतं... तसचं काहीसं झालयं नशिबानं घात केलाय... नियतीनं साथ सोडलीयं... आता फक्त एक उसासा... नशीबाच्या आघातावर... त्या पुरग्रस्तासारखा... त्रिशिला त्रिशिला साळवे कविता जीवनाची#
त्रिशिला साळवे कविता जीवनाची# #poem
read moreTrishila Salve
*आयुष्याची एक संध्याकाळ अशी असावी* आयुष्याची एक संध्याकाळ, अशीही असावी... पुनः पहिल्याच रात्रीसारखी, तुझी मिठी मला पडावी... तुझ्या हळूवार पवित्र स्पर्शाने ,माझा रोम रोम खुलावा... तुझ्याच हाताने माझा ,श्रुंगार पुनः सजावा... सर्वांसमक्ष तू माझ्यावर, चुंबने वर्षावी... बेभान होवून मजला, उरी कवटाळून धरावी... आवेग ओसरल्यावर तुझा, मिठी तू सैल करावी... विस्कटलेली माझी टिकली, तू अश्रूभरीत नयनांनी पुनः लावावी... मोठ्या हिमतीने मला,नवरीसारखी सजवून... तुझ्याच हाताने ,सरणावर ठेवावी... आयुष्यात एक,संध्याकाळ अशीच यावी... माझी प्राणज्योत तुझ्या, अंतरीच सामावून जावी... त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८ कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे#
कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे# #poem
read moreTrishila Salve
*वेदनेशी माझा...* वेदनेशी माझा,आताच करार झाला... अश्रुनांही माझ्या हक्काचा निवारा झाला.. चेहऱ्यावरील मुखवटा,आताच तयार झाला... मग खोट्याच त्या हास्यालागर्भारपण तो आला... प्रेमात ती भंगली,दिली घेतली वचने... विरह बघ कैसा,नववधु साज घालून आला... मानभंग साहूनी सख्या,चित्तात संत आला... नकोच आता मनधरणी,काळजाचा अंगार फार झाला... वेदनेशी माझा, आताच करार झाला... तुझ्या माझ्यातील दुरावा,आताच बोलका झाला... 🙏🙏त्रिशिला🙏🙏 जीवनाची कविता कवयित्री त्रिशिला साळवे#
जीवनाची कविता कवयित्री त्रिशिला साळवे# #poem
read more