Nojoto: Largest Storytelling Platform

Best भूपतिवैभव Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भूपतिवैभव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 1 Stories

उमा जोशी

ती लपवत असते पदरामागे लाज
मिळणार कशी पोटास भाकरी आज
मी काय करावे भरण्यासाठी पोट
बघती निलाजरे तिच्या स्तनांचा घाट

ना हौस तिला या बाजारी बसण्याची
पण उरली नाही वाट तिला जाण्याची
रोजच रुततो का उरात मग तो काटा  
का तिच्याच नशिबी आला हा भोगवटा

दररोज नव्याने वधू बनत असताना
बोचतात काटे शय्येवर निजताना
अपराधीपण टोचते जिवाला इतके 
कोडगे होत जाते मग मनही तितके

चाहूल लागते मग नवीन जीवाची
पोटात धुमारे अन चिंता जन्माची
कसले जगणे देणार असे मी त्याला
अधिकाराने कोणत्या घालु जन्माला

हुरहूर मनाशी आत पोखरे चिंता
ती होइल कारण मग बाळाच्या अंता
हाकलूनही नाही विचार ते जात
चालते बिचारी इस्पितळाची वाट
--- १८/०१/२०२३

©उमा जोशी  #भूपतिवैभव #वृत्तगंगा #भोगवटा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile