Nojoto: Largest Storytelling Platform

Best दिबा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best दिबा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about दिबानी मै दिबानी dj, दिबानी मै दिबानी फिलम, दिबानी मै दिबानी, दिबानाथ सेन,

  • 1 Followers
  • 6 Stories

Dileep Bhope

Dileep Bhope

कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा..?

रोज नवे हातखंडे विचार पाशवी
सत्ता, संपत्ती, वैभवाची ही हाव राक्षसी.  
करु लागते मतदारांसी अनिर्बंध प्रतारणा. मतदारांचा हा अपमान नक्की.. वेळ येईल पुढे  तेव्हा होईल  विचारणा..  
अक्षम्य अपराधाची ज्या जाणीव नाही... तोडतात लचके गिधाडे. आठवण याची आपण ठेवू पुढे..

दलदलीत बरबटून ज्यांनी नासवली लोकशाही.. आज भले तोरणे,माळा फुलांच्या तयांना लावू द्या अत्तर.. प्रत्येक अपराधाचे उद्या त्यांनाही द्यावेच लागेल उत्तर...
नका बाळगू जन हो खंत..  इथेच झाला हिटलरशाहीचा अंत.. 

#दिबा

©Dileep Bhope #प्रतारणा

Dileep Bhope

सारखीच माया साऱ्या झाडात पेरलेली
अवेळी पानझडीचे मग काय अर्थ घ्यायचे?

#दिबा/*🐒

©Dileep Bhope #पानझड

Dileep Bhope

Dileep Bhope

निकाल

सारेच प्रश्न तुमचेआमचे
ठरु लागलेत गौण 
लागेल निकाल कुणाचा?

"मस्तवाल झाले  गवत
झाडांनी पाळले मौन"
एवढाच नाही अर्थ याचा!

#दिबा

©Dileep Bhope #निकाल

Dileep Bhope


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile