Find the Best वेळी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutएकाच वेळी अर्थ, एकाच वेळी meaning, जेवणाच्या वेळी म्हणायचे श्लोक, ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे, एकाच वेळी दोन पदव्या,
Sujata Darekar
रात्रीच्या वेळी एक काजवा चमकतो किर्र अंधारात टिमटिमता तो प्रकाश पण उजेड त्याला देतो काळोखात एक छोटीशी वात तू ही पेटव वेड्या खोल अंतरात बघ प्रभात उजडेल तुझी मग लखलखती जशी चांदरात नैराश्याची करून होळी प्रदीप्त कर तुझी सांजवात जीवन होईल सुरेल गाणे आशा तुझी रे येता रंगात शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreyogesh atmaram ambawale
पुरी रात जागून काढली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली, समजलं नाही सकाळ केव्हा झाली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली, छान मैफल तुझ्या आठवणींची जमली रात्रीच्या वेळी जेव्हा याद तुझी आली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#रात्रीच्या_वेळी#तुझी_याद#yqtai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रात्रीच्या वेळी... #रात्री #वेळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taaiरात्रीच्या_वेळीतुझी_यादyqtai
read moreVaibhav Maid
गरूडालाही कुठे माहिती असतं जन्मल्याबरोबर, आपण झेपावणार आहोत कधी उत्तुंग आभाळी, मात्र आपण गरूडच आहोत, हे त्यानं हेरायच असतं अगदी अचूक वेळी.. अगदी अचूक वेळी.. ..✍वैभव उर्फ अनुभव ०२.१०.२०१९
stoneheart_amya
एवढ पण भंगार नाहीये माझ प्रेम,😑 कि तु प्रत्यक वेळी लायकी दाखवुन द्याव.😶 अण प्रत्येक वेळी मीच समजाव. तुला समजत नसेल तर सोड.😃 i dont care😄 #amolg #chiuu #shayri #nojoto #love poonam.....!@ Soumya Jain Nehu❤ Priya
Vinayak Das
गुंतण महत्वाचं.कळतयं पण... 😊 पण आलाचं ना. हो, कळतयं पण भीती वाटते.. नाहकच असेल कदाचित पण आहे. आजच पहिल्यांदा भेटलो आणि गुंतलो.. खुप बोलावं वाटतं अश्या वेळी, पण विषय सुचतं नाहीत. तसे मला सावरायला जुने प्रश्न दिमतीला येऊन उभे होतेच या ही वेळी. 'तिला काय वाटेल?''काही गैरसमज तर नाही ना करुन घेणार ती?''हि पहिलीच भेट खरं तर, ही योग्य वेळ आहे का?' आणि तोच जुना प्रश्न 'खरंच आहे का आपली पात्रता,त्या योग्यतेची?' आणि या सर्वांसोबत एक नवाच प्रश्न आज नव्याने आला, 'तू पुन्हा प्रेमात कसं काय पडू शकतोस, काय ही तुझ्या पहिल्या प्रेमाची प्रतारणा तर नाही ना?' (खरं तर हा प्रश्न निरर्थक, पण तरीही आपलं अस्तित्व सिद्ध करून गेला) प्रश्न, पहिलेही मला निशब्द करायचे आणि आज ही त्यांनी तेच केलं.ती मात्र निर्भिडपणे माझ्याशी संवाद साधत होती. शेवटी आपलंच मन आपली गोची करतं हे मात्र खरं. मी फक्त तिच्या प्रश्नांना उत्तर करत होतो. तिच हसणं न्याहळत होतो, कदाचित ती माझ्या अवघडलेपणावरचं तर हसंत नाहिये ना, असं ही वाटुन गेलं. पण छे हो, इतक नितळ, निरागस हास्य ते, त्यावर इतका कोता संशय घ्यावा.. माझीच मला लाज वाटली. मी निर्धाराने भावनांना सावरून होतो. भीत सुध्दा होतो... काय सांगव, हा बांध कधी तुटेल ही. बराच काळ या सुख वर्षावा भिजत असतांना, वेळ आपलं कार्य साधतचं होती, अविरत वाहण्याचं. खरं तर ज्या वेळी वाटंत असत, वेळ जरा काळ थांबावा तो तेव्हाच इतक्या लवकर निघुन जातो ना.... असो, दोन तासच ते, फक्त तिच सोबत असणंच, मनाला उधाण देणारं होतं... गुतांयच नाही अस मनाशी ठरवलेलं असतांना ही, तिच्यात नकळत गुंतत जाणं, अनोखं होतं, विस्मयातीत करणारं होत, बाकी सगळं विसरायला लावणारं होतं. आज हे सगळं तुला सांगायच ठरवुनच आलो होतो, शेवटी तुच तर हक्काची मैत्रिण आहेस ना माझी... माझ्या प्रिय डायरीस् तुझा 'राही औरंगाबादी' #involvement is needed
#Involvement is needed
read moreMeena
शांत वेळी, एकांत क्षणी लहरी मनात असते , काहुर मनी मन होते सागर, विचार लहरी येते स्पर्शून गगण लाटेवर लाट होऊन आरूढ,करी शब्दांचे मंथन मन सुन्न ते खोलात जाऊन पाय रूजवले मन भरून येते ,काय मिळवले, काय गमावले कळू न शकले द्विधा मनस्थितीत ह्रदयाला छेडले आपल्याच तंद्रीत का ते राहिले सूर्या सम अश्रू चमकू लागले अस्ता प्रमाने हळूहळू खाली ओघळू लागले ह्रदयाला शब्दांच्या लाटा, किनारा देत होता लाटांचा आवाज तो आवाज दाबत होता पूर्ण असूनही लाटा विना अपूर्ण होते जखम ही अंतरींची लाटेत वाहून देत होते आंधळ्या अ़धांरातही चंद्राची साथ होती चंद्र हा माझा एकांत अनुभव होता तो माझ्याशी जुळवून घेत होता अशांत वेळी शांत तो करत होता.. मिनाक्षी..
Gokul Tapadiya
# घटस्फोट : मुलाचीही बाजू! ‘घटस्फोटिता’ म्हणून स्त्रियांना सहन करावे लागणारे दु:ख आणि अपमान हळूहळू कमी होत आहेत आणि मुलीही याकडे अधिक वास्तवतेने पाहत आहेत. तसेच समाजही घटस्फोटाकडे सकारात्मकतेने पाहत आहे ‘घटस्फोट’ ही मुलगा व मुलगी त्याचबरोबरच त्यांचे आई-वडील, नातेवाईक जवळचे स्नेही सर्वानाच क्लेष देणारी बाब असते. घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या मुलाचे/पुरुषाचे दु:ख व वेदनाही लक्षात घ्यावयास हवी. या अनुभवातून जाणाऱ्या अनेकांची वेदना कोर्टात जाणवली आणि सहवेदनेतून संवादही झाले, त्यातून बदलत्या समाजाने लग्नाकडे पहाण्याच्या दृष्टीचे प्रखर वास्तव चटके देऊन गेले व जात आहे. घटस्फोटातून जाणारे मुलगे तिशीच्या आसपासचे आहेत (बहुसंख्येने हा वयोगट दिसतो कोर्टात). त्यापैकी अनेकांना चांगले पगार आहेत. करिअरच्या दृष्टीने त्यांची विचारसरणी नेमकी आहे. सहमती घटस्फोटासाठी तयारी ठेवणारे आहेत, त्यामुळेच अनेक जण याला तयारही होत आहेत, पण त्यामागचे अजूनही एक सत्य लक्षात घ्यायला हवे ते असे की, या ‘सहमती’साठी मुली कित्येक लाखांची मागणी करताना दिसत आहेत. त्याला पालक व वकीलदेखील काही अंशी साथ देत आहेत. कायदा मुलींच्या दृष्टीने झुकते माप देणारा असल्याने मुलांची ‘अडवणूक’ करून कित्येक लाखांतच सहमती दिली जाते आहे. एवढी गलेलठ्ठ रक्कम (एकरकमी पोटगी/ अलीमनी) मिळते . हा तर झटपट श्रीमंतीचा मार्ग सापडल्यासारखे बऱ्याच मुली करत आहेत. मुला-मुलींत मतभेद असतील तर किती आई-वडील याचा समंजसपणे विचार करतात हे पाहण्याजोगे आहे. इतके लाखो रुपये व मनस्ताप मोजल्यानंतर त्या मुलाची या विवाहातून सुटका झाली तरी हा मुलगा खरच विश्वासाने दुसऱ्या विवाहाकडे पाहू शकेल का? तर नाही हेच उत्तर असावे. याशिवाय त्या मुलाला पुन्हा आर्थिक, मानसिक जबाबदारीने दुसऱ्या विवाहाकडे जावे लागते, तर मुलीला आर्थिक पाठबळ मिळालेले असते आणि सामाजिक सहानभूतीसुद्धा! बऱ्याच वेळेला अशा एकरकमी पोटगी घेणाऱ्या मुली पुन्हा लवकर स्थिरस्थावर होत असल्याचे दिसते. घटस्फोटात ‘स्त्रीधना’चाही विषय असतो. लग्न करताना दोन्हीकडचे नातेवाईक आपल्या परीने दागदागिने देऊन लग्न करतात. तेव्हा घटस्फोट होईल असे कोणाच्याच मनात नसते. त्यामुळे एकुलत्या एका मुलीला/ सुनेला घरातले पारंपरिक व स्वत:कडीलदेखील दागदागिने घातले जातात. मात्र घटस्फोट प्रक्रिया सुरू झाली की त्यातल्या प्रत्येकावर मुलीचा हक्क शाबीत केला जातो. खरे तर हा मुलगा नवरा म्हणून नको तर त्याच्याकडचे दागदागिने, पारंपरिक चीजवस्तू का हव्यात? मुलीपण कमावत्या आहेत पण किती जणी खरेच हे सर्व समजून सोडतात याचा विचार न्यायालयात होतो का? मुलाच्या घटस्फोटात त्याच्या आई-वडिलांच्याही जिवाची घालमेल होत असते. त्यांचे दु:ख, अवहेलना, अडवणूक यात त्यांना साथ देणारे कमीच असतात. खरे तर त्यांच्यासाठीपण ‘साहाय्यक गट’ कार्यरत करावे लागणार आहेत. कारण त्यांना गुन्हेगार समजून कधी ४९८चा धाक दाखवून तर कधी खोटय़ानाटय़ा आरोपांनी वकील मंडळी घायाळ करत असतात. घरी आलेल्या मुलीला घरातील पद्धती/ चालीरीती/ विचार सांगितले तर त्या मुलीचा मानसिक छळ, बळजबरी, कौटुंबिक व घरगुती हिंसाचार इ. नवनवे आरोप झेलून त्यांचे खच्चीकरणच होते. नव्या पिढीला हस्तक्षेप नको पण तो कोणत्या टोकापर्यंत हे समजायच्या आतच सारे घडते आहे. अशा वेळी किती मुलींचे पालक संतुलित भूमिका घेत आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मुली जर सुज्ञ असतील तर हे सहजतेने सुटणार नाही का? कायदेशीर प्रक्रिया चालवणारे आणि आपल्या मुलीला गलेलठ्ठ भरपूर एकरकमी पोटगी व स्त्रीधन मिळवून देणाऱ्या सर्वानी संधीसाधूपणा सोडून न्यायतेने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा अनेक मुली घटस्फोट हाच झटपट श्रीमंतीचा मार्ग स्विकारून तरुण मुलांची लूट करण्यास कचरणार नाहीत आणि त्यातून अनेक समाजस्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत राहतील, यात शंका नाही... पहा हेच सध्या च्या वेळी जास्तीत जास्त पहावयास मिळत आहे ...
Kushab Fajage
"ज्या ज्या वेळी आपली नजर भिडते ना, त्या त्या वेळी मी तुझ्या प्रेमात पडत असतो."😍😘 #NojotoQuote प्रेम #राधा#आयुष्य#प्रेम
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited