Find the Best marathikvita Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Harshada wakchoure
बघताच तुला तो संपला तुझ्या डोळ्यातील स्वप्नात तोच हरवला नाही उरले भान कसले मनात हे कसले कल्लोळ उठले चांदणं तुझ्या सौंदर्याच त्याच्या मन नभात पसरलं स्वप्न त्याचं.... त्यालाच गवसलं पौर्णिमेचा चंद्र गं तुझ्यात दिसला बघताच तुला तो स्वतःला विसरला केलीस कसली जादू, तू मनरमणी... बघून तुजला तो त्याचाच नुरला ओठांवरच्या स्मितात तुझ्या मन अडकून गेले न उरले भान कसले मन वेडे होऊन गेले मन गुंतणे यालाच म्हणतात रे मनाच्या नयनांनी तुला पाहते रे #talk#lifeexperience#story#rap#quote#comedy#poem#nojoto#nojotoapp#marathikvita
Harshada wakchoure
जन्म जन्मांतरीचे नाते तुझेमाझें अविश्वासाला नाही इथे जागा !! आलीच कधी आणीबाणी तर उसवण्याआधीच तू हो सुई मी धागा!! #Love#nojoto#nojotoapp#nojotomarathi#kvita#poem#quote#nojotonews#nojototelgu#marathikvita
Harshada wakchoure
नाही इथे कोणी कुणाचा खेळ होई फक्त मनाचा तोंडावरती गोड बोलुनी चाले डाव हा नेहमीचा सुखाचे होती सारे सोबती दुःखात असता विसरून जाती खऱ्या खोट्या सहाऱ्याची तेव्हा लोक जाणीव करून देती कठीण प्रसंग येता समोर सगळेच दूर पळून जाती फुकटचे सल्ले देण्यासाठी तोंडाची पट्टी चालू ठेवती निसटून जाता पैसा सारा चेहरे खरे दिसू लागती पंगतीत बसून जेवणारे ही ताटात उष्ट वाढून जाती नको कुणाची मदत आता नको कुणाचे उपकार जीवनाच्या कसोटीवर चल मारू हिंमतीने षटकार #nojoto#nojotoapp#nojotonarathi#marathikvita#nojotohindi#nojotomarathi#poem
Harshada wakchoure
पडक्या भिंती पडक्या भिंतींनाही आहे अजुनी ओलावा मायेचा पाहता काळीज तुटत जाते आवाज येतो आईच्या हाकेचा गावाकडची मातीच न्यारी हृदयांना घट्ट सांधणारी नसेल कुठले नाते तरीही आपुलकीने मने बांधणारी सय आजीच्या गोधडीची हवासा खजिना गोष्टीचा खाऊ देताना माझ्यासाठी थरथरणारा हात मायेचा आठवते हिवाळ्यातली आगटी गप्पांचा फड उभारणारी आणि उब आईच्या कुशीची वत्सलतेने मज बिलगणारी आधारवड माझ्या बाबांचा घराचा डोलारा तोलणारा क्षणोक्षणी आठवत रहातो पाठीवर हात फिरणारा पाहता पडकी भिंत आजही दृश्यपट तो उभा राहतो एकेकाळच्या नंदनवनाची आजही तो साक्ष देतो #nojoto#nojotoapp#nojotomarathi#marathikvita#nojotopoem#nojotohindi#nojotonews#nojotobestpoetry
Harshada wakchoure
कोरोना नाही.. वेडी तुझ्यावाचून करमेना असं झालंय.. #nojotomarathi#hindinojoto#talk#lifeexperience#story #rap#comedy#quote#marathikvita#nojototelgu
Harshada wakchoure
nojoto#nojotomarathi#marathikvitanojotovideo#nojotohindi#Talk#Stories#Rap#poem#bestpoem
read moreRenuka Dehankar
#marathi #marathikvita #marathichodoli #renudehankar #renukadehankar
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited