Find the Best पावसाची Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutपावसाची कविता, पावसाची गाणी हिंदी, पावसाची गाणी lyrics, वादळी पावसाची वैशिष्ट्ये लिहा, पावसाची सुरुवात,
Manisha Dongre Kulkarni
#पावसाची सर #भावना #manimau #manishadongrekulkarni #yqtaai
#पावसाची सर #भावना #manimau #manishadongrekulkarni #yqtaai
read moreYogesh Hiwrale
"नको देवा मला ही पावसाची सरं... येता पावसाची सर माझी होई तारांबळ घरावर छप्पर असून नसलेले आहे घरामंदी पाणी साचून भांडे घराबाहेर वाहे एगळाच हाय देवा तुझा न्यावं आरं जित्या परी मेल्या धडाला ज्यादा भाव आता व्हत नही, सहीनं सोसू कुठवरं नको देवा मला ही पावसाची सरं... या या पावसानं पोरीचं लगीन मोडलं मह्या सर्जा राजाला बजारात धाडलं आरं 'गारा' नही त्वा अंगार बरशिवली व्वा रं तुही किमया पाण्यानं चिंता पेटवली लोकाह्यचं सोड, तूच नही आमच्या भल्यावरं नको देवा मला ही पावसाची सर... मागचाच दुसकाळ फिटता, फिटना आन, 'गारपीटीनं' आणला तेरावा महीना आम्हा शेतकऱ्यांवरच नजर तुही तिरकी चुकून माकून एखादा सावकार ही धर की डोंगर 'खडा' वाटतो ह्यांच्या कर्जा म्होरं नको देवा मला ही पावसाची सरं... भाकरीतला शेतकरी दिसतो का कोणाला पण शेतकऱ्याची भाकर दिसती देवाला शेतकरी म्हणून जलमलो हाच माझा गुन्हा साकडं घालतो तुला, जलमा घालू नको पुन्हा आमच्या मारणाचं उगा खापर फुटल तुझ्यावरं नको देवा मला ही पावसाची सरं"... कवितेचं नाव:#गारपीट #2014
कवितेचं नाव:#गारपीट 2014
read moreKailas Tidke
#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण देऊन जाईल.. कुणीच कुणाचं नसता हे सत्य शिकवून जाईल.. ®कैलास #पावसाची सर
#पावसाची सर
read moreKailas Tidke
#OpenPoetry पुन्हा एकदा पावसाची सर तुझी आठवण घेऊन येईल.. कुणीच कुणाचं नसत हे सत्य शिकवून जाईल.. ®कैलास #पावसाची सर
#पावसाची सर
read moreकवी अनिकेत मशिदकर
// सर पावसाची // ओल्या पावसाची सर देह चिंब ओलावून गेली विसरावे कसे प्रेमाला तुझ्या प्रितीची आठवण करून गेली...// // सर पावसाची //
// सर पावसाची //
read moreRahul Mohite
आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती कडक चहाला कांदाभजीची सोबत होती उनाड वारा नुसताच वाहत होता आभाळ आपल्या जमिनीकडे ओल्या डोळ्यांनी पाहत होता त्या दोघांची प्रेमकहाणी थोडी आगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती समोरच एखादी वीज कडकडत होती ढगांसोबत जणू ती बडबडत होती उन्हाळ्याची उष्णता आता संपणार सगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती आजचा पाऊस नुसताच बरसत होता जमिनीला भेटणयासाठी खुप तरसत होता मातीचा सुगंध चोहीकडे पसरत होता मातीच्या त्या सुगंधाची चवच वेगळी होती आजच्या पावसाची गोष्टच वेगळी होती ✍🏻राहुल साहेबराव मोहिते prince🤴🏻 At. वडनेर तालुका मालेगाव जिल्हा नासिक
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited