Nojoto: Largest Storytelling Platform

Best भरारी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best भरारी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutभरारी meaning in english, भरारी कविता, भरारी वाला गाना, भरारी गीत, बरारी गाना,

  • 3 Followers
  • 4 Stories

Shankar Kamble

चिरा–चिरा घडवून श्रमाने
मानवतेचे बांधू मंदिर
क्षणभंगुर श्वासाचे देणे
प्रेमे नांदो आपण सहोदर..

हेवा जावो धुवून मनाचा
निर्मळ व्हावे आता अंतर
द्वेश,किल्मिषे जाळून टाकू
करू मोकळे भरले अंबर..

भार उचलू मिळून सारे
एकजुटीची मूठ आवळू
निढळावरचा घाम सांडता
गंध मातीचा फुले परिमळु..

बंद कवाडे करून मोकळे
साद ऐकू रे अंतरीची
ताल देवूनी हृदय सांगते
गती एक ती एकपणाची..

नवे पंख अन् नवी आव्हाने
रोज खुणावे क्षितिज मोकळे
कवेत घेण्या आकाशाला
तोड बंधने जुने, खुळे..

©Shankar Kamble #Light #मानवता #माणूस #जीवन #जगणं #जीवनअनुभव #उड्डाण#भरारी

Shankar Kamble

खुशाल त्यांनी वार करावे
झेलाया मी आहे तत्पर
आभाळाची तमा कशाला
पंखच माझे देती उत्तर..

अस्तित्वाची तुझी लढाई
जुनाच कित्ता युगायुगांचा
काळ्या खडकांच्या छातीवर
विजय पताका अंकुराचा..

आव्हानांना कोळून प्यालो
फेकून अस्तर जुने पुराणे
कोश विणले लख्ख प्रकाशी
नको आळवू सांज तराणे..

धुळीत माखून गेल्या वाटा
जायबंदी पाय कधीचे
उरांत धडकी भरते तेंव्हा
काठ सोडते पाट नदीचे..

श्वास मोजूनी दिले आजवर
उसने होते हसणे– रडणे
दोर नाचवी जसा बाहुली
जगणे केवळ केविलवाणे..

वाटा माझ्या जरी रोखल्या
झेप कोण रोखणार आहे?
मला खुणावे क्षितिज मोकळे
डोह मनाचे भरून वाहे..

©Shankar Kamble #cloud  #पंख #आभाळ #भरारी #संघर्ष #संघर्षाची_तयारी_करा #लढा #टक्कर

Arun Chinchangi

भरारी...

घ्यायचीय उंच भरारी आकाशात 
स्वप्नांना नवे पंख देवून
अन् करायचंय विहार मुक्तपणे
स्वच्छंदी पक्षाप्रमाणे कोणतीही तमा न बाळगता...

बागडायचंय रानाफुलांत स्वैर फुलपाखराप्रमाणे
अन् पसरवायचाय गंध मलाही त्या सुवासिक फुलाप्रमाणे
मग आसरा घेता घेता द्यायची आहे मलाही 
एक दिवस सावली वटवृक्षाप्रमाणे...

देतो प्रकाश सूर्य उगवून दररोज नव्याने 
कोणताही थांबा न घेता, न थकता
पाडायचाय प्रकाश मलाही स्वकर्तुत्वाने
अन् उजळवून टाकायचीय दुनिया माझी नव्याच ऊर्जेने...

करायचीत काबीज, शिखरे नवी खुणावणारी
अन् पोहचायचंय त्या खुणावणाऱ्या क्षितिजापलीकडेही
मग पहायचंय रोखून नजर जगाकडे
अन् अनुभवायचीय ती सुंदरता नव्याने जगण्यासाठी...

असेल माझेही एक विश्व
त्यात असेन राजा मीच माझ्या स्वप्नांचा
वाटेल हेवा जगालाही माझा 
अन् घुमेल नाद आसमंतात माझ्या किमयेचा...

                    ✍ - अरुण शि. चिंचणगी.

आयुष्याच्या संघर्षरुपी वाटेवर स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक वाटसरूस कविता समर्पित...! #भरारी... #my_inspirational_poem..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile