Find the Best सुरेशभट Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सुरेश भट गझल, सुरेशभट,
aaj_ki_peshkash
sonali Kulkarni
हा ठोकरून गेला, तो वापरून गेला जो भेटला मला तो वांधा करून गेला वेशीवर मनाच्या आले सवाल सारे माझा सवाल माझ्या ओठी विरून गेला माझ्याविना फुलांची दिंडी निघून गेली काटाच प्यार आता जो मोहरून गेला चाहूल ही तुझी की , ही हूल चांदण्याची ? जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला केव्हाच आसवांची गेली पुरून गावे स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा ? मागेच दुःखितांचा टाहो मरून गेला कानात कोठडीच्या किंचाळला झरोका बाहेर एक कैदी तारा धरून गेला आजन्म ही तुझी मी केल्यावरी प्रतीक्षा माझाच भास माझ्या अंगावरून गेला सुरेश भट - #RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal
#RaysOfHope #आवडलेलंकाही #सुरेशभट #गझल #gazal
read moresonali Kulkarni
कुपी वाट आहे पाहतो मी फक्त एका उत्तराची भावनांना कैद आहे रोखलेल्या आसवांची यापरी होती बरी उबदार सूर्याची दशा सोसवेना धग अताशा कोवळ्या या चांदण्याची एकही सौदा अता जमणार नाही सावल्यांशी सवयही होतेच आहे मोकळ्या उघड्या उन्हाची वाटते चिंता तुझ्या त्या रम्य एकाकी घराची नेम धरुनी सज्ज आहे नजर तिरकी वारियाची आठवांचा गंध आहे दरवळाया लागलेला सांडली नकळत कुपी का अंतरीच्य़ा अत्तराची ? -सुरेश भट #feelings #Love #प्रेम #मराठी #कविता #सुरेशभट
sonali Kulkarni
दूर दूर चांदण्यात दूर दूर चांदण्यात मी असाच हिंडतो ! तारकांस हालचाल मी तुझी विचारतो ! वाटते कधी चुकून भेटशील तू अजून थांबतो पुन्हा मधून अन् उगीच सावल्यांत सैरभैर पाहतो ! चाललो असेच गात ऐकते उदास रात चंद्रमा झुरे नभात अन् इथे फुलाफुलांत मी तुलाच शोधतो ! -सुरेश भट #Flower #sureshbhat #सुरेशभट #MarathiKavita #मराठी #मराठीकविता
sonali Kulkarni
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! ऐक तू जरा माझे सोड मोह स्वप्नांचा! आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही!! जाहली न कोणाची सांग राखरांगोळी! आपुलीच रांगोळी काढणे बरे नाही!! आज मोकळे बोलू! आज मोकळे होऊ! जीव एकमेकांचा जाळ्णे बरे नाही!! कालचा तुझामाझा चंद्र वेगळा होता! हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही!! मैफलीत या माझ्या पाहतेस का खाली! हाय...लाजणाऱ्याने जागणे बरे नाही!! - गझलकार सुरेश भट हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!!
हे तुझे अशावेळी लाजणे बरे नाही! चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही!! जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे! मागचे जुने देणे टाळणे बरे नाही!! #Light #गझल #Life_experience #सुरेशभट
read moresonali Kulkarni
अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला... तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला... - सुरेश भट! अंदाज पावलांचा ,पाऊला गणिक चूकला... तेथेच त्या क्षणाला ,अपघात मात्र झाला... - सुरेश भट! #सुरेशभट #गझल #alone
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited