Nojoto: Largest Storytelling Platform

Best गझल Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गझल Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutकिसी शायर की गझल, तीना जी की गझल, तिने परवीन की गझल, ताहिर चिश्ती की गझल, आठवले की गझल,

  • 35 Followers
  • 65 Stories

SATYAJIT ANANDRAO JADHAV

Kiran Chougule

alone

aaj_ki_peshkash

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही #मराठी #सुरेशभट #कविता #गझल #आग

read more

Shankar Kamble

गझल...

जाणत्या नेणत्या पणाचे हिशोब सारे राहून गेले
बंद मुठीतून ओघळणारे क्षण अत्तरी वाहून गेले

गुदमरलेल्या श्वासांनाही उसने थोडे श्वास मिळाले
डोकावून मग झरोक्यातूनी उनं बोचरे पाहून गेले

जगण्यासाठी धडपड करते धडावेगळे शीर अजूनी
नाळ गुंतली पाझर ओला किती उन्हाळे नाहून गेले

गर्द हिरवी झुकलेली नाजूक डहाळी आंब्याची
नवलाईचा मोहर गळता रूपं दर्पणी दावून गेले

रुळलेली ती वाट आजही रोज चालतो निगुतीने
शोध नव्या वाटांचा घेता वाटं पुरती लावून गेले

शांतीचा मी पाईक आहे साक्ष देतो वधस्तंभ हा
खबरदार जर खरे बोलशील जल्लाद सारे धावून गेले

कशांस नुसती उठाठेव ही? सूर्य अस्तास कधीच गेला
एक खुळी पण आस पेरली गीत पहाटे गावून गेले

©Shankar Kamble #MerryChristmas #गझल #मराठीप्रेम #जीवन #सुख #झुंज #लढा #कोणी #सत्य

Shankar Kamble

जळणाऱ्या त्या चितेकडे उगां एकटक पाहत बसलो
आत पेटला जाळ तरी राख उद्याची वाहत बसलो

दबा धरून बसलेल्या श्वानांच्या झुंडी जागोजागी
लचके तोडून कशा हसती पाठ शांतीचा सांगत बसलो

जात माझी तोलतो "तो "पारड्यात ठेवून माणुसकीला
माप भरण्या माणुसकीचे मीच मला मग कापत बसलो

पोतलेला रंग निखळतो खपली उडते पुन्हा पुन्हा
पाया खचला तुझाच वेड्या दोष घराला देतं बसलो

विरक्तीचे हे भस्म लिंपूनी सोहळा झाला देखणासा
पोळे पाहून मधुर घटाचे एकाक्षाने सेवत बसलो

डोळ्यांच्या खाचा झाल्या मन पाझर पाझर आटले
खणतोय पुन्हां तळ आता बळ उसने मागत बसलो

चूल आहे विझली माझी काळोख दाटला भवती
चिमण्यांची फडफड नुसती सूर्यास ऐकवीत बसलो

पायांना माहित कुठले? वाटेचे बंड अघोरी
धुडकावून रुळल्या वाटा पथ नवीन शोधत बसलो

©Shankar Kamble #Parchhai #गझल #मराठीप्रेम #मराठीविचार #मरण #चीता #भस्म #जीवन #मृत्यू

Shankar Kamble

कसे ओळखावे तुला भेटल्यावर?
कसे शांत होणार रान पेटल्यावर?

दवाचे सडे आज भिजले अवेळी
नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर..

गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे
तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर..

जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा
गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर..

फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती?
होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर..

जुळवून आज घेते सुखाचे उखाणे
अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर?

भरभरून श्वास आता लाभले परंतु
ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर?

©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता

Shankar Kamble

वेदनेचा बाजार मांडला दुःख विकण्या सांगतो मी
भार दाटला पुन्हा ढगाला डोळ्यांत पाऊस मागतो मी

पेटलेल्या उन्हांत आता झाड सोसते तप्त झळाला
आठवून मग उंबऱ्याला जीव उगां का जाळतो मी?

मतलबी दुनियेत होते पायपुसणी भाबड्याची
कातडी जपतो स्वतःची पारखून जग वागतो मी

टांगली कित्येक स्वप्ने का नव्याने न्याहाळतो?
देवून चकवा पांगलेल्या पाखरांना भांडतो मी

माखलेल्या गर्द हळदीचा गंध  ना लाभला
रंगल्या मेहंदीतल्या हातांस दूर पाहतो मी

सळते जीवांला जाळतेही पुन्हा पुन्हा ती सांगते ही
भंगलेल्या राऊळाच्या पायरीला थांबते मी 

उघड्यावरचा असा पसारा आज वाटतो आवरावा
गाठोड्याचा भार शिरावर मूकपणाने चालतो मी

©Shankar Kamble #Past #गझल #वेदना #दुःख #जीवन #जगणे #जगणं #सांजवेळ

Sanket Chaudhary

कुचे =रास्ते =roads इश्क के कूचे मे थे खाली.... बस खाली रह गए.... गझल #yqdidi #yqquotes #गझल poetry #yqdada

read more
जो हमसफ़र ने हाथ छोड़ा 
हम सवाली रह गए...
इश्क के कुचे मे थे खाली, बस खाली रह गए...

हमने इश्क मे रजा मांगी... 
अपनी आझादी से सजा मांगी... 
एक पत्थर दिल को वफा मांगी... 
उसके हुक्म को सरआँखों रख के.... 
 दीवालिया हो गए.... 
इश्क के कुचे मे थे खाली, बस खाली रह गए... 

हो गए हम हर महफिल मे जंगी.. 
ना रहा सगा और ना संगी... 
कभी ना मिली हमे मुहब्बत चंगी... 
अपने जुबान को अंगड़ाई दे के..
मवाली हो गए... 
इश्क के कुचे मे थे खाली, बस खाली रह गए... 

हर शामों की हमने सुबह मांगी... 
हर मर्ज की उससे दवा मांगी.. 
वो झूठी मुहब्बत बेढंगी... 
अपणे प्रेमगीत को छोड़ के... 
शायराना हों गए.... 
इश्क के कुचे मे थे खाली, बस खाली रह गए... 
 हमसफ़र ने हाथ छोड़ा 
हम सवाली रह गए...
इश्क के कुचे मे थे खाली, बस खाली रह गए... कुचे =रास्ते =roads
इश्क के कूचे मे थे खाली.... बस खाली रह गए....
गझल
#yqdidi
 #yqquotes 
#गझल
#poetry
#yqdada

अल्पेश सोलकर

सध्या तर जमिनीवरच आहे कधीतरी ' अंबरात ' होतो.. कुठे बाहेर मी नव्हतोच... सखे तुझ्या ' अंतरात ' होतो... दहाजणींतून देखणी तू तसाच मी ' शंभरात ' होतो © अल्पेश सोलकर

read more
सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..

कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...

दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात ' होतो— % & सध्या तर जमिनीवरच आहे
कधीतरी ' अंबरात ' होतो..
कुठे बाहेर मी नव्हतोच...
सखे तुझ्या ' अंतरात ' होतो...
दहाजणींतून देखणी तू
तसाच मी ' शंभरात ' होतो
© अल्पेश सोलकर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile