Find the Best सावळा Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutसावळा रंग in english, सावळा meaning in english, सावळा in english, दाटला मेघ तू सावळा, सावळाच रंग तुझा,
शब्दवेडा किशोर
#सावळा तो विठुराया माझा.... सावळा तो विठुराया माझा जागोजागी तयाचा मज होई भास मन होई लगेचच कासावीस लागे तयाच्या दर्शनाची आस निवृत्ती,ज्ञाना,सोपान,मुक्ताई, एकनाथ,नामदेव,तुकाराम नामाची पालखी पंढरीस निघाली झांज,चिपळ्या,टाळ,विणा अन् मृदंगाच्या जयघोषाने पंढरीतली भिमा अन् चंद्रभागाही सुखावली वायूवेगाने अश्व माऊलीचे जेव्हा धावे अंगी त्याच्या तेव्हा नवचैतन्य साचे टाळ मृदुंगाच्या जयघोषात रिंगणी माझा वारकरी विठ्ठल नामात दंग होऊनीया नाचे युगे अठ्ठावीस तो देव माझा आहे उभा विटेवरी रूप गोजीरे तयाचे साजे तो आहे भक्तकैवारी असा नसे ज्ञानियांचा राजा सकळ श्रीमंत दुजा या भु-वरी @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #विठुमाऊली
Deepali Ghoge
सखा सावळा.. कधी इंद्रायणी काठी कधी यमुनेच्या तीरी.. कधी होऊन सावळा घनी बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
#कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
read moreअल्पेश सोलकर
सावळा रंग हा माझा.. सांग तुला शोभेल का..? जत्रेत तू माझ्या सोबत बिनधास्त तू फिरशील का...? हाच माझा जीवनसाथी.. ठाम पणे सांगशील का..? होईल जेव्हा रंगावरून विनोद सांग त्यांना तू आवर घालशील का..? सखा साजना तुझा सखे सावळा ग.. सांग सुखाने नांदशील का..? वाटलं चुकीचं काही /हवा बदल थोडा थेट माझ्याशी मांडशील का..? लाखात एक असा तुझ्याच पसंतीचा.. सांग आता आपलासा करशील का..? नको प्रियशी आता..नको बायको म्हणून घेऊ.. " कारभारी न " अशी हाक माझी ऐकून घेशील का..? नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
read moreShankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited