Find the Latest Status about जीवनगाणे गातच रहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनगाणे गातच रहावे.
Sujata Bhalerao
भेदून पुढे चाललो , अंधार रातीला दिव्याची अंधुकता आज साथीला आयुष्याची स्वप्ने बांधली गाठीला सोडून गेले सारे माझा कंठ दाटला एकटा राहिलो मी कुणी ना भेटला माझ्यात मी अन् माझा मार्ग एकला पुढे जात असतानाच रस्ता खचला माझ्या कामाचा मीच क्रम आखला काम पूर्ततेचा मला हर्ष वाटला मनोमनी सुखावून आनंद जाहला आता पर्वा ना कुणाची सांगतो मनाला तिमीरातूनी तेजाकडेचा अर्थ गवसला ©Sujata Bhalerao जीवनगाणे#गातच रहावे
जीवनगाणेगातच रहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
अलगद स्पर्श हाताचा झाले वलय पाण्याचे जणू शुभ्र लाटांप्रमाणे तरंग उठती तयाचे किमया की जादूगिरी या मनमोहक दृश्याची पारणे फिटे डोळ्याचे साठते प्रतिमा नयनी ©Sujata Bhalerao जीवनगाणे #गातच राहावे
जीवनगाणे #गातच राहावे #मराठीविचार
read moreSujata Bhalerao
अगदी मधासारखे बोट असावे माझे अन् टिपावा मकरंद निरागस फुलपाखराने नकळत जडेल नाते सुगंधी फुलासारखे अवघे मधाळ होईल सारे जीवन माझे गट्टी होता घट्ट त्याशी सदा बरसती हर्ष राशी स्वच्छंदी कसे जगावे त्याच्याकडून शिकावे ©Sujata Bhalerao जीवनगाणे #गातच राहावे
जीवनगाणे #गातच राहावे #जीवनअनुभव
read moreSujata Bhalerao
हा प्रकाश मज वाटे शीतल अन् हवाहवा... जणू या झाडामागे चंद्र असे झोपलेला... ते चांदणे टिपोरे चंद्रमाही पौर्णिमेचा... उजळून आले सारे अवघेअंधारलेले जग... लख्ख प्रकाश सारा काळोख कुठेच नसे... तेजोमय धरती सारी मजला खुणावते आहे ... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
आपल्याला सर्वजण सोडून गेले तरी ... आपल्या सोबत सदैव साथ जिची ती आपली सावली ... सावली कधी गडद तर कधी फिकी सावली कधी लहान तर कधी मोठी .... आपल्याच सावलीला घाबरुन कसं चालेल तीच करेल सोबत शेवटच्या श्वासापर्यंत ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीकविता
read moreSujata Bhalerao
किती मनमोहक किती ते आरस्पानी नैसर्गिक सौंदर्य एकटक पहात रहावं डोळ्यात साठवून ठेवाव अनोखं रुप तुझं गंधाळलेले ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीविचार
read moreSujata Bhalerao
येणारी प्रत्येक सकाळ न्हाऊन निघू दे सुगंधी फुलांसारखी मोहरु दे प्रत्येक क्षण फुलोऱ्यासारखा आकाशी जाऊ दे बहर फुलांचा आसमंतात दरवळू दे जीवनगाथा निरभ्र होऊ दे माझे जीवनगाणे स्वच्छंदी होऊ दे सर्वांचेच जगणे 💫🙌 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीशायरी
read moreSujata Bhalerao
खुर्चीचा मोह काही आगळाच मी मी म्हणणाराला झटकन उतरवती कधी पैशाचा लोभ दाखवून तर कधी.... पैशांचीच घालून भिती कैक गारद होती खुर्चीच्या मोहापायी भारुन टाकते अंतर्बाह्य हे येड्या गबाळ्याचे काम नसे नक्कीच किती आले अन् किती गेले गिनतीच नाही उरली ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीविचार
read moreSujata Bhalerao
निसटत चाललं आहे सारं काही पण अजूनही वेळ आहे सावरण्याचा प्रयत्न करुया आवरुया स्वतःला आणि गुंतलेल्या पाशातून मुक्त करुया मोकळा श्वास घेण्यासाठी सारं संपण्याआधी फक्त एकदाच प्रयत्न करुया... ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीविचार
read moreSujata Bhalerao
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे बालकवी 🌾🌱🌿🍃☘️🪴🌴🌳🌲 ©Sujata Bhalerao #जीवनगाणे#गातच राहावे
#जीवनगाणे#गातच राहावे #मराठीसंस्कृति
read more