Find the Latest Status about पैशाचा पाऊस पाडतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पैशाचा पाऊस पाडतो.
Dharmendra Gopatwar
चमत्कार पैशाचा .... .by Dharmendra Gopatwar लहान मुलांना कळतं भाषा पैशाची आजोबांच्या बिडी सिगारेट ला प्रिय असते पैसा नोटा रंगबिरंगी डोळ्यांना मोहित करतात म्हणे काळा पांढरा नाव ठेवले की पैसे रुसतात म्हणे . पैसे बोलतात सरकारी टेबलाखाली बसून गोष्टी करतात . नात्यांत रंग भरतात पैसा मुका बोलतो कासव धावतो देवालाही प्रिय असतात म्हणे मंदिराचे दार बंद झाले की पुजारी चे उदरनिर्वाह चे कारक पैसा पैसा असेल की अन्यायी च न्याय च पाठ देतो पैसा पोटपुरते च असले पाहिजेत म्हणे थोड जास्त दिसले तर चोराची नजर अति पैसे असले की सरकारची धाड झोप येणे न येणे याच कारण बनते पैसा बोले आणि चाले पैसा हसवे आणि फसवे पैसे पैसे पैसे मिळाले की रुपया होतो रुपया रुपया मिळाले पैसे होते दिवसेंदिवस महागाई च्या रावणाचे वीस तोंड होतात DlGopatwar दुनिया गोल आहे प्रवासाला निघाले परत येऊन इथेच पोहचतो इथून निघायला गरज पैशाची वर्तुळ फिरायला आवश्यक गांधीजीच्या लाठी ची गांधीजींची लाठी पैसा . पैशामुळे कासवच बनतो ससा . पैसा असले की नाती सोबत हसतात नसले की रुसतात नोटावराचा गांधीजी हसतो आणि माझ्या हातात गांधी जी आला की माझ्या हसण्या चा कारक बनतो . DlGopatwar 30 टक्के लोक देशातला 70 टक्के पैसा घेऊन विदेशात धावतो 70 टक्के लोक देशातला 30 टक्के पैसे वापरून देशभक्त बनतात . गरिबाला मिळत नाही पैसा माध्यम वर्गाला उरत नाही पैसा उच्च वर्गाला इन्कटॅक्स ची भीती अति उच्च श्रेणीतील लोकांची सरकारला भीती ... 70 टक्के पैसा विदेशात 30 टक्के पैशांनी देश चालतो पैशामुळे सत्कार .....पैसाच चमत्कार...✍️ ©Dharmendra Gopatwar चमत्कार पैशाचा..✍️
चमत्कार पैशाचा..✍️ #ज़िन्दगी
read moreDevanand Jadhav
•पाऊस नि पाऊस• काय हो पाऊस होता तो यंदा त्यानं बळी राजाचा केला वांदा तो बसला होता डोळे लावून पण हा आला अक्कड घेऊन कुठे तो सर्वदूर बरसला तर कुठे कुठे काय रुसला कुणा देऊन गेला समाधान तर कुणाचं केलं घमासान पुढच्या फेरीत खुशीत आला सर्वदूर तो बरसून गेला बळीराजा तर हर्षून गेला नवी स्वप्ने रंगवत बसला अन् परतीचा पाऊस आला इथे तिथे तो चौखूर पडला कुठे पडला तो ढग फोडून कुठे बळीचे हृदय फाडून मात्र हाहाकार करून गेला काय तो यंदा पाऊस पडला ©•साहेबराव मुळे• बागवान नगर, शिरूर. ©Devanand Jadhav पाऊस नि पाऊस...!!!
पाऊस नि पाऊस...!!! #मराठीकविता
read moredipak Rathod
मी पाऊस बोलतोय.... खिडकीत उभा राहून कोणी जा जा करतोय, तुंबलेल्या छता खालून कोणी ये ये करतोय, मला कळना मी काय करू मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... अवकाली पडलो तर शिव्या उशिरा आलो तर शिव्या, कमी पडू की जास्त रिमझिम पडू की धबधबा, प्रश्नाचे उत्तर मी शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय.... प्रदूषण तुम्ही करा ,पाणी तुम्ही आडवा मग तुंबतात नाली गटारी, वार्याने उडतो पत्रा त्यासाठीही दोशी मी का ठरतोय, मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... कोनी माजावर कविता करतोय ,कोनी गाते गाणी हो मला एवढं काही किमान रुक्ष लावा ,एक तरी वृक्ष शोधतोय मी पाऊस बोलतोय मी पाऊस बोलतोय..... लेखक........ दिपक राठोड ©dipak Rathod मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal
मी पाऊस बोलतोय.... #पाऊस #MereKhayaal #poem
read moreDurga Deshmukh
भावना उचंबळून येतात तेव्हा डोळ्यात येऊन बसतो पाऊस आनंदाने मन भरुन येताना गालावर हळुच नाचतो पाऊस 1 आठवणीत तुझ्या सख्या डोळ्यात थिजुन बसतो पाऊस कधी रडवतो खुप मनाला कधी ह्दयात हसतो पाऊस 2 सांगता येत नाही वेदना तेव्हा मुका होऊन बसतो पाऊस रात येते तुझ्या शिवाय विरहाने व्याकुळ डसतो पाऊस 3 अंगावर पडता रिमझिम धारा मनात माझ्या ठसतो पाऊस चिंब चिंब भिजुन मला बाहुत तुझ्या कसतो पाऊस 4 कधी हसवतो कधी रडवतो कधी वेडाच असतो पाऊस तुझ्या आठवणीत रडुन सुद्धा कधी येत नसतो पाऊस 5 दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh पाऊस
पाऊस #मराठीकविता
read moreDileep Bhope
दाटले आभाळ तेव्हा व्हायचे होते पाऊस मनात माझ्या काय ते होते तुलाच ठावूक ©Dileep Bhope #पाऊस
Dileep Bhope
कोटी कोटी वृक्ष कागदांचे माळ बोडखे, वाढीव वस्त्या घोळ धरतीस काय तो ठावूक असंख्य योजनेगत ढग पांढरे देत हुलकावण्या सारख्या कधी सरकारच वाटतो पाऊस! ©Dileep Bhope #पाऊस
Vrishali G
मुसळधार पावसाचे थेंब चेहेर्या वरून झिरपत आहेत जाता जाता माझ्या डोळ्यातील अश्रू पण सोबत वाहून नेत आहेत ©Vrishali G पाऊस
पाऊस #मराठीकविता
read more