Nojoto: Largest Storytelling Platform

New जीवनाची जोडी आपली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जीवनाची जोडी आपली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनाची जोडी आपली.

Stories related to जीवनाची जोडी आपली

    LatestPopularVideo

Vrishali G

जोडी

read more
एक कमान आहे तुझ्या माझ्या प्रीतीची 
आपल्याला एकत्र ठेवुन शिवाय जोडून ठेवणारी 
आता यातच दिसु दे चित्र आपल्या दोघांचे आणि म्हणू देत सगळी 
जोडी आहे बुवा शोभणारी ❤ जोडी

Vishal Chavan

#जोडी

read more
जोडी..

तुझी माझी जोडी म्हणजे, चप्पलची जोडी सखे..
एक जर हरवली तर, दूसरी भरकटलेली होडी सखे...

इथे कुणाच्याही एकट्याच्या, अस्तित्वाला मान नाही..
एकट्याचं जीवन एक असं समीकरण,की जे समान नाही

तुझ्याविना मी म्हणजे, अर्ध्यात तुटलेला घाट आहे..
माझ्याविना तू म्हणजे, एक थांबलेली वाट आहे...

शक्ति सामर्थ्य सौंदर्याला, एकटे राहून अर्थ नाही..
तुझ्याविना माझी नजर, सार्‍या जगी केवळ अनर्थ पाही..

Vishaaal/Aadinaath 
19-07-21

©Vishal Chavan #जोडी

Mohan Somalkar

# जीवनाची कविता #मराठीकविता

read more

Trishila Salve

जीवनाची कविता# #poem

read more

Monika jayesh Shah

जीवनाची कविता

read more
जीवनाची कविता

©Monika Shah जीवनाची कविता

Trishila Salve

जीवनाची कविता#

read more
*नाही आठवत आता*

नाही आठवत आता
सांजवेळ चर्या भेटी

निस्तेज होत जाणाऱ्या तेजोनिधीसह
दुसरं झालेल्या सांजवेळच्या आठवणी...
उगाच नको आता
संवेदनेची ती शिरशिरी
थंडावत चालली
सांजवेळच्या प्रितीची कहाणी...

नकोच आता सख्या
सांजवेळच्या प्रवासाची पर्वणी
ओझरत्या स्पर्शातूनही भळभळेल
विरहाची जखम पुराणी..

 प्रा.त्रिशिला साळवे
९९२२३६३६२८/९११२८५९६६९ जीवनाची कविता#

Trishila Salve

कविता जीवनाची #poem

read more
सकाळीच गच्च भरलेल्या
आभाळाची आणि माझी
 झाली नजरानजर...
त्याने ओळखले मनातील इप्सित आणि 
त्याच्या सहस्त्र अश्रुंच्या धारात...
चिंब चिंब केलयं मला...
आभाळाच्या मिठीच्या
आवेगाने समजलयं रे...
रात्रभर तो तुझ्यासह
विरहात जागला होता...
आता फक्त तुझा निरोप
 द्यायला आला होता...
फक्त तुझा निरोप द्यायला आला होता...

त्रिशिला साळवे कविता जीवनाची

Trishila Salve

कविता जीवनाची #Music

read more
*आठवतयं तिला आज*

आठवतयं  तिला आज सुरुवातीला 
किती सहज आणि सुंदर लिहायचासं तू...
ओघवतेपणाने...
मांडायचीस तिची वेदना...
दर्दी शब्दात...
कनवाळू अक्षरात...

प्रत्येकीला वाटायचं तू तिच्याबद्दल लिहलयं...
कारण ती इथून तिथून सारखी ना...!
 थोडीशी हळवी...
मग सहज ती तुझ्या प्रत्येक शब्दात, 
प्रत्येक अक्षरात तिलाच शोधायची...
कधी तुझी प्रेयसी बनून...
कधी तुझी सखी बनून...
कधी तुझी प्रीत बनून...
कधी तुझी बहीण बनून...
कधी तुझी आई बनून...
आणि तुही आणायचासं आव
आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्याचा...
उधळाचास शब्दांची फुले...
बांधायचासं अक्षरांची तोरणे...
त्याला भरायचा अश्रुचा दर्दी रंग...
अन नजाकतीने पेश करायचास...
तिच्यावरील ढोंगी प्रेमाची कविता...
आणि घ्यायचास टाळीवर टाळी...
प्रत्येक उच्छवासावर...
त्याच तिच्यावरील ढोंगी कवितेने तुला बहाल केलं कवित्व,
श्रेष्ठ कविपद...
स्त्रीवादी कविपद...
अन बदलास तू...
तुझी प्रेमकविता बनली थोडी उथळ...
तिच्या सौंदर्याच वर्णन करणारी...
तिच्याच शरीराचं प्रदर्शन मांडणारी...
तिची स्त्रीसुलभ भावनाही
टाळीसाठी तू लिहलेली...
आता तुझी कविता ती वाचत नाही...
त्यात ती स्वतःला शोधत नाही...
शब्दाला दाद देत नाही...
 आताच्या तुझ्या कवितेत ती असतेच कुठे रे...?
तुझ्या कवितेत असते फक्त एक स्त्री...
तुला प्रसिद्ध करणारी...


त्रिशिला साळवे
९११२८५९६६९ कविता जीवनाची

Akshay Tayde.

विटंबना जीवनाची #poem

read more
शब्द जुनेच आहे, 
तरी गीत नवीन बनते आहे
वाट जुनीच आहे, 
पण वाटसुरू नवीन भेटत आहे
माणुसकी जुनीच आहे,
परी अर्थ तिचा नवीन वाटत आहे
कशी रे जीवना विटंबना तुझी
कोणी जीवनदान देत आहे,
कोणी जीव घेत आहे. विटंबना जीवनाची

Diksha Wardhe

आपली माती आपली माणसं...

read more
चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा,
 नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा,
चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा,
 सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. 
आपली माती आपली माणसं...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile