Find the Latest Status about कातरवेळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कातरवेळ.
शब्दवेडा किशोर
#आयुष्याची कातरवेळ.... आगमनासरशीच अनाहुतपणे कधीकधी अस्तित्वही नकोसं होतं मग ती माणसं असो किंवा अवघड अशी कातरवेळ @शब्दवेडा किशोर ©शब्दवेडा किशोर #कातरवेळ_ही_आयुष्याची
कवी - के. गणेश
दिवस माझा असाच सरतो बसत नाही कशाचाच मेळ.. तुझ्याच आठवणीत पुन्हा, हळूच येते कातरवेळ...! कातरवेळ....
कातरवेळ....
read moreShubhada
अशा किती 'कातरवेळांचे' आपण दोघेच साक्षीदार. काल तू माझ्या सोबत होतास. आज मी तुझ्या 'शोधात' आहे. ©शुभदा कातरवेळ
कातरवेळ #thought
read moregauri kulkarni
#कातरवेळ कातरवेळ मनाचा तळ ढवळून टाकणारी. कितीही इच्छा नसली तरी नको त्या आठवणींना फेर धरून सभोवताली नाचवणारी. अशा वेळी हमखास निसटलेल्या माणसांची अन् त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण येते. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असलेल्या दुःखाला अचानक जाग येते. अशावेळी लादलेला एकांत खरंच खूप जीव घेतो. कितीही प्रयत्न केला तरी कधीतरी ही कातरवेळ वेळ साधून गाठतेच. नको नको म्हणताना हात पडकून नेतेच आठवणींच्या राज्यात. या राज्यातून परतण्यासाठी मार्ग एकच भविष्यासाठी आठवणीच अशा बनवा ज्यांना आठवून चेहऱ्यावर हलकेच हसू येईल अन् डोळ्यात जरी पाणी असले तरी ते सुखाच्या क्षणांची साठवण असेल. त्यासाठी खूप काही नाही मनाची पाटी कोरी करता यायला हवी. दुःखाचा बॅलन्स कमी ठेवत सुखाने प्रत्येकाची ओंजळ भरत जावी. मग आपोआपच कातरवेळ लक्ष्मीच्या पावलाने सुख आणेल अन् समाधानी मन आयुष्यात रंग भरेल हवेहवेसे. #गौरीहर्षल #कातरवेळ#firstquote
#कातरवेळ#firstquote #गौरीहर्षल
read moreVilas Bhoir
श्वेतकिनारी कातरवेळी नकळत येते सांजसावली पाहुन उन्हाचे चांदणे केशरी जवळची नवका दूर राहीली नवी नवखी वाट उमटली पाऊलखुण वाळूत रोवली अपरिचित झाले होते नव्हते लाटांवर लाट उसळून आली काठावर फेसाळ मखमली भासते सारखी सडारांगोळी तारुण्य फुलवीत सदा जीवनी अंतःकरणी हृदयी प्रीत जागली तिच पाऊलवाट पुसलेली दाही दिशांत रस्ता हरवलेली असे गुंतून राहिलो पैलतीरी मी अंधारी राञ आसपास विरलेली मिटले डोळे नीज लागली चंद्र लपला खुल्या आभाळी हे दिसले होते स्वप्नात मलाही होताच जागे कळले कातरवेळी ( श्वेतकिनारी कातरवेळी ) ~ विलास भोईर श्वेतकिनारी कातरवेळी #DawnSun
श्वेतकिनारी कातरवेळी #DawnSun
read moreShankar Kamble
दिस ढळतीला आला सांज पेंगुळ्या सावल्या ओढ्याकाठी बनांमध्ये हरिणी त्या थबकल्या रंग शेंदरी, केसरी पखरण रानोमाळ मनां कसलं गारुड? घाली रिंगण भोवळ रानपाखरांचा थवा दूर ढगांत पांगला वाट चुकूनी एकला राघू एकाकी थांबला उगां लावी जीवां घोर वेळ कातर कसली? खूर उधळीत धूळ जशी काजळी बसली नाच नाचणाऱ्या लाटा जणू भानावर आल्या पायी सोडून घुंगरू कुठे विरहिणी गेल्या? मूख मलीन कळ्यांचे गंध कसा हरवला? आस लागे भ्रमराची मधु संग दुरावला ©Shankar Kamble #citylight #सांजवेळ #सांज #सांजहीवेडलावी #सांजवेळी #सांजवेडी #कातरवेळ #ओढ #तू
RJ कैलास नाईक
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता होणार नाही सुगंधी कधी वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा मनात रचले होते सुखाचे किती मनोरे का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा.. *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो
#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो
read more