Nojoto: Largest Storytelling Platform

New याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, याला.

    LatestPopularVideo

शब्दवेडा किशोर

White वाटलं लिहावं काहीतरी किती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पावसाळे येऊनिया गेले
भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेल कारण
पाऊस सोडून त्याला कुणीच पाहिलं नाही
तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं अन् मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच
रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कितीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर
मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातचं काहीच न राखता थेट
सर्वांच्या काळजाला जाऊन भिडणं 
त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात जुन्या साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती
कधी आठवतो वाफाळलेला चहा तर
कधी आठवतं सोबत असलेलं ते कवितेचं पुस्तक
तर कधी आठवतं ते नुसतं बसून त्याला न्याहाळलेलं एकटक
कधी आठवते गरम भजी वडा अन् मित्रांसोबत केलेली ती धमाल
तर कधी आठवतं गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल
कधी आठवते उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री
कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळं काढून बघण्याचे
काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच की हिवाळे अन् उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातंच ना मी पाहीलेत इतके पावसाळे

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

आपल्याला माणसांचा खुप संग्रह करणं इतकंही सोपं नसतं
जितकं पुस्तकांचा संग्रह करणं सोपं आहे कारण
पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी आपल्याला पैशांची गुंतवणूक
करावी लागते तर माणसांचा संग्रह
करण्यासाठी भावनांची कदर करण्याची
मनापासुन तयारी लागते..

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

#सावडता सावडता..
एक दिवस अनाहूतपणे श्वास संपले माझे
अन् मला स्मशानात नेऊन जाळलं
गेले माघारी ते सारे आप्त सोयरे परतुन
पूर्ण चिता जळपर्यंत कुणी थांबलं देखील नाही
कवटी फुटली तेव्हासुद्धा एकानेही मागे वळून नाही पाहिलं
मीच मजला श्रद्धांजलीपूर्वक भावफुल अर्पियलं......
राखेच्या ढिगाऱ्यात फक्त उरली हाडे
एकलाच मी भुत होऊनी ती सावडत सावडत राहिलो 
कुठेच दिसेना गर्व पद प्रतिष्ठा पैसा तरीह
 राखेला खालीवर करत राहिलो......
डोक्यात होती कालपर्यंत ती सत्तेची धुंदी भिनली 
त्या धुंदीपाई कुणाला कधी मी भीक नाही घातली 
राखेला सावडत सत्ता शोधत राहिलो 
पण तरी हाडाला चिटकलेली धुंदी नाही दिसली......
राखेत काहीतरी शिल्लक हवं होतं मडक्यात कोंबता तरी आलं असतं
हाडं काही तिथेच सोडावी लागली राखेत ऐश्वर्य शोधता आलं असतं......
मद मत्सर स्वप्न आशा श्वास नशा 
सावडता सावडता त्यातलं माझं आधीचं अस्तित्व शोधत राहिलो 
देवा..अरे किती आग पाखडशील हे देवाला विचारत विचारत
कुठं गेलं सारं तेच त्या राखेत शोधत राहिलो......
राखेत ऊब धगधग शिल्लक होती
तेव्हाच मग पूर्वज मग माझे मज सोबत न्यायला आले
पाण्यात धुवून स्वच्छ मोकळं करून सोबत मजला कायमचे घेऊन गेले
सावडता सावडता काही नाही उरलं अन् होतं तिथं जे काही उरलेलं
तेही मग आपसुक मातीला मिळालं..
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

मनाचा गाठताना तळ..

मनाचा गाठताना तळ तु जराशी घे खबरदारी
तिथे लागेल रे चकवा तुला ये पुन्हा तु परतून माघारी

मला सुटता सुटे न कोडे हे कधीही आजतागायत
थबकती पावले माझी अजूनी का तुझ्या दारी

पित्याने वाटणी केली खरं तर याचसाठी की
खबर मिळताच तो गेल्याची मुले लढतील
होण्यास घरचा कारभारी

मला तू शोधले केवळ घराच्या अंगणामध्ये
अन् दिवसभर मी मात्र उभा होतो तुला पाहत तुझ्याच परसदारी

मी निजवतो नाइलाजाने कित्येकदा उपाशी लेकरे माझी
मला फळली मज न यंदाही विठूराया तुझी ही वारी

येईल मी फिरूनी नव्यानं परतुन तुझ्या दारी
तेव्हा तरी कर किरपा आणि भर माझी
फाटकी झोळी शिवून दाव मज तुझी 
पुन्हा एकदा किमया ती न्यारी

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

किती छान होईल ना..??

पुस्तकाची पाने पलटताना एक विचार मनात येतो
आयुष्याची पाने अशीच पलटली तर..
किती छान होईल ना..??
स्वप्नात अनेक गोष्टी पूर्ण होतात पण
खऱ्या आयुष्यात पूर्ण झाल्या तर..
किती छान होईल ना..?
काही लोक स्वार्थासाठी शोधतात मला पण
निस्वार्थीपणे कुणी माझ्या शोधात आलं तर..
किती छान होईल ना..??
मन मारून काळीज कुणीही घेऊन जाईल माझे पण
मन जिंकून काळीज नेणारी भेटली तर..
किती छान होईल ना..??
जिवंतपणी तर सगळ्यांना मी हसवत ठेवीन पण 
माझ्या मरणावरही कुणी येणाऱ्या अश्रूतही हसले तर..
किती छान होईल ना..??
आत्माही माझा असाच हसतंच तेव्हा सगळ्यांना साद देऊन जाईल पण 
नंतर त्या राखेतही मला कुणी शोधत बसले तर..
किती छान होईल ना..??

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव..

शब्दवेडा किशोर

#श्वास बुक
खिशातून पन्नासची एक नोट जरी पडली तर बेचैन होणारा माणूस
आयुष्याची वर्षे उलटली तरी परिवर्तन येत नाही..अगदी बिंधास्तपणे जगतो..
काय दुर्दैव आहे ??
आजच्या काळात स्मशानभूमीची सुरक्षा किती मजबूत असते हे तर विचारूच नका साहेब..अहो पैसा तर फार दूरची गोष्ट आहे
इथं देव जन्माला येताना सोबत घेऊन आलेला श्वासही मरताना
सोबत घेऊन जाऊ देत नाही..मग तुम्ही कितीही मोठे किंवा तुमची थेट वर पर्यंत ओळख असली तरी..
काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो
अन् रात्रंदिवस वय पितो व आपलं आयुष्य खातो
व माणूस समजतो मी जगतोय....
माणूस खाली बसून संपत्ती मोजतो.. काल किती होती व आज
ती संपत्ती किती वाढलीय..
अन् वरती तो हसणारा देव मात्र सतत माणसाचे श्वास मोजतो..
काल किती होते ? आज किती उरले व
उद्याची श्वास घ्यायची ग्यारंटी व संधी याला द्यावी का ??
तर चला..उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी
त्याला विशेष बनवून जगून घेउया..पासबुक व श्वास बुक
दोन्ही रिकामे असल्यास भरावेच लागतात.
पासबुकात रक्कम व श्वासबुकात सत्कर्म....म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत हसत घालवा..रडुन वा खचून तरी काय साध्य होतं ??

" काळाचा कावळा बोंबलून सांगे
जिथं अती तिथं मातीच झाली.."
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

#मी आहे ना..so..Every thing will be fine....
       आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाचंच आलेली नसतात.प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.कुणाशी कुणाचे तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का अन् कशी होते ? याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही.जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी.आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे..रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं.
          It's mutual relation..मन जुळलं की आपलेपणाचं नातं तयार होतं.जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कुणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत.आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे "मी आहे ना" हे शब्द अगदी संजीवनी सारखे काम करतात.अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं सुद्धा खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं आणि मेन म्हणजे या जगात पैशांनी श्रीमंत होणं खूप सोपं आहे अन् नात्यांनी समृद्ध होणं तितकंच कठीण....
            शेवटी आपल्याला पैशाची श्रीमंती हवी की आपल्या हक्काच्या माणसांची अन् आपल्या हक्काच्या रक्ताने नाही पण कर्माने मिळालेल्या किंवा कमावलेल्या लोकांची.....ते आपणंच ठरवायचं असतं.
Am I Right Frined's ????
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

शब्दवेडा किशोर

शब्दवेडा किशोर

कुणीच कुणाच्या जवळ नाही हीच खरी समस्या आहे 
म्हणून जगण्यात पौर्णिमा कमी अन् अमावस्या जास्त आहे
हल्ली माणसं पहिल्यासारखं दुःख कुणाला सांगत नाहीत 
मनाचा कोंडमारा होतोय म्हणून आनंदीही दिसत नाहीत
एवढंच काय 
एका छताखाली राहणारी तरी माणसं जवळ राहिलीत का ?
हसत खेळत गप्पा मारणारी कुटुंब तुम्ही पाहिलीत का ?
अपवाद म्हणून असतील काही पण प्रमाण खूप कमी झालंय 
पैशाच्या मागे धावता धावता दुःखच जणू खूप वाट्याला आलंय 
नातेवाईक व कुटुंबातले फक्त एकमेकाला बघतात 
एखाद दुसरा शब्द बोलतात पण काळजातलं दुःख दाबतात
जाणे येणे न ठेवणे,एकमेकांना न भेटणे अन् न बोलणे 
या गोष्टी कॅज्युअली घेऊ नका गाठी उकलायचा प्रयत्न करा 
जास्त गच्च होऊ देऊ नका
धावपळ करून काय मिळवतो याचा जरा विचार करा 
बँकेचे अकाउंट भरण्यापेक्षा आपल्या माणसांची मनं भरा
एकमेकांजवळ बसावं अन् क्षणभर बोलावं अन् सतत तिरपं चालण्या
ऐवजी कधीकधी थोडं सरळ रेषेतही चालावं
समुद्री चोहीकडे पाणी अन् पिण्याला थेंबही नाही अशी अवस्था झालीय माणसाची 
यातून लवकर बाहेर पडा चर्चा करून उपाय शोधा नुसता Convent,CBSE,MBA,
IIT,MS,पॅकेज,Business & managements skill,Second Home,Europe Tour Registry,Dimond Jwelary याला काहीही अर्थ उरणार नाही 
माणसं अन माणुसकी नसलेली घरे अन् देव नसलेले देव्हारे 
कितीही पॉश असले तरी त्याचा काय उपयोग
फुकटची श्रीमंती जपून तरी सांगा काय उपयोग
म्हणून सांगतो आतातरी काळचक्र ओळखा अन् पैसा पद प्रतिष्ठा जपण्यापेक्षा
माणसं अन् माणसातली माणुसकी जपा..

©शब्दवेडा किशोर #याला_जीवन_ऐसे_नाव

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile