Find the Latest Status about हरवली पाखरे गाणं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवली पाखरे गाणं.
"Rup"
हरवली पाखरे #पाखरे #मैत्री #कट्टा #दोस्ती #दुनियादारी.#दुनियादारी #ये love #मराठीप्रेम
read moreRajendrakumar Shelke
*का माणुसकी हरवली..!* *वर्णसंख्या(९/७/९/७)* *************************** का हरवली माणुसकी कळत नाही *खरे,* स्वार्थासाठी सरसावले ढोंगी पहा *चेहरे.* मीपणात विसरून गेले नात्यातील *अंतर,* मनालाही कळले नाही प्रेमातील ते *सार.* आज कुठे देव राहिला कोणालाही ना *कळे,* माणसातील खरा भाव सतत दूर *पळे.* रक्ताची नाती खरंतर फसवीच *निघाली,* समोरासमोर देखील खोटे बोलू *लागली.* स्वतःच्याच त्या स्वार्थासाठी माणुसकी *सोडली,* आपलेपणात मनाची व्यथा सारी *मांडली* ----------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke का हरवली माणुसकी
का हरवली माणुसकी #poem
read moreVilas Bhoir
ओथंबल्या क्षणास पहाट साद घाली प्रहर होताच नव्याने सकाळ अवतरलेली दंगलेल्या स्वप्नात रंगून मन गेले निद्रिस्त देहालाही हलकेच जाग आली मंद वाऱ्याच्या झोक्यात तरु सावली भास्कराच्या येण्यात क्षणात फुलली कळी पानाफुलांवर दवबिंदूंचा ओलावा धुसट दिसे हरित-तृणांवर शोभती थेंब धुक्याचे मखमली रातराणी उमलून गंध पसरला अवेळी पांघरून धुके पूर्वेस आली लाली कधी सोनेरी कधी केशरी रविकिरणे अंगणातूनी थेट दारावरी अलगद न्याहली कुजबुज पाखरांची कधी अबोल पाखरबोली मोकळ्या आभाळी थव्यांनी नक्षी रेखलेली कोवळ्या उन्हाची झळ अंगावर बागडते शितल होऊनी पुन्हा दुरवर विरघळली धुक्यात हरवली वाट चंचल स्वप्नातली चालताच पुढे वळणावरी पाऊले उमटलेली दाटलेले धुके विरण्यास सज्ज झाले जवळपास जाताच वाट मोकळी झाली ~ विलास भोईर ( धुक्यात हरवली वाट ) धुक्यात हरवली वाट #CalmingNature
धुक्यात हरवली वाट #CalmingNature
read more