Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्त्रीजन्म Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्त्रीजन्म Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 8 Stories

शब्दवेडा किशोर

#स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा......
क्षणभर आरशापुढे उभी तू रहा
स्वतःलाच स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा
मान्य आहे दिवसभर कामं खूप असतात
एकापाठोपाठ ते कामं फक्त
तुझ्याच डोळ्यांना दिसतात
दिवसातले तुझ्यासाठी मिनीट काढ दहा
अन् क्षणभर आरशापुढे उभी तू राहा
व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा
सासू-सासरे,मुलं,पती सर्वांसाठी तु राबतेस
तुझ्या छंद आवडी मात्र ओठा आड दाबतेस
छंद आवडी तुझ्याही कधी फुलवून तर पहा
अन् क्षणभर आरशापुढे उभी तू रहा व
स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा
मुलगी,बहीण,पत्नी,आई म्हणून तर जगायलाच हवं
पण त्यासोबतच तुझ्या अस्तित्वाकडेही तू बघायला हवं
तुझ्या कर्तृत्वालाही थोडी उभारी येऊ दे
चार-चौघी मध्ये तुझंही नाव होवू दे
जीवनाचा आनंद खरा घेऊन तर पहा
अन् क्षणभर आरशापुढे उभी तू रहा
व स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा
मान्य आहे काही दिवस करतील सगळे राग
किती दिवस धुमसत ठेवशील मनातली ती आग
रागाची ही सवय त्यांच्या कर आता स्वाहा
अन् क्षणभर आरशापुढे उभी तू राहा व
स्माईल प्लीज असं स्वतःला म्हणून तर पहा
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म

शब्दवेडा किशोर

#स्त्री...

सारी बंधने तुलाच का ?
तु म्हणजे सतत संस्काराच्या ओझ्याखाली दबलेली अत्तराची जात
तु म्हणजे नेहमी असावे सातच्या आत घरात 
आमची माञ राञी-अपराञी येते वरात....
सारी कामं तुलाच का ?
ऑफिसमधून थकून आल्यावर गॅसपुढे तुच स्वतःला पोळवुन घ्यावं
आम्ही माञ टि.व्ही पाहत अंथरूणात लोळावं
साऱ्या जबाबदाऱ्या तुलाच का ?
तुलाच भरण्यासाठी जावं लागतं अन् करावी लागते सतत वणवण
लाईट बील,पोरांच्या शाळेची फी,रेशन बील
अन् हॉस्पिटल तसेच बरेचदा हॉटेल बील
आमची माञ या कामात कमी होते पोझीशन
हे असं कुठपर्यंत चालणार ? कधी ही परिस्थिती कधी बदलणार ?
की वर्षानुवर्ष तुझं आयुष्य असंच सरणार ?
अनेक प्रश्न आहेत मनी
काळजाचा ठाव घेतात
ते क्षणोक्षणी
तुलाच करावं लागतं
सतत सारं सहन
कधी सुटणार हे सर्व प्रश्न गहन ?
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म

शब्दवेडा किशोर

नारी सबला की अबला तु ??
एक अबोल प्रश्नचिन्ह....
नारी सबला की अबला तु समजत नाही पण एक मात्र खरं तु धगधगती आग अशी जिचा प्रकाश मात्र पौर्णिमेच्या चंद्रासारखा  लुकलूकतात तुझ्या रूपात आमच्या आयुष्यात सदा ध्येयवादी तारे
जणु संग तुझा आकाशातील कोमल सुकुमार चादंण्यासारखा
जन्मा येताना घेऊनी येते तू नात्यांमधला गोडवा 
आभाळापरी माया तुझी राही सर्वांवरी अन् उरी जपतेस सदा सहनशिलतेचा अनमोल ठेवा 
अनेक वीरपुरूषांची जननी तू असे तुझ्याच ह्रदयीच्या प्रागंणात रसाळ अनेक धगधगती तेजरूपी बिजे आम्हा लाभे सदा विद्येचे दान तुझे आत्मबल जणु काटेरी जीवनबागेतील यशाची रसाळ बिजे
मायेच्या पखांची उब तू चंदनाचा देहरूपी गाभारा तू ऋतुप्रमाणे जीवनाचा निसर्ग तू
वाऱ्याची मंजुळ झुळूक अन् उन्हातला गारवाही तू कधी मुलगी म्हणून मायेचा कवडसा तू
तर कधी अर्धागीनी म्हणून प्रेमाचा पाझर तु तर कधी आई म्हणून आयुष्याच्या  रणांगणातील योद्धा तू तर कधी सासु अन् आजी म्हणून संस्काररूपी शाळा तु कधी सुखानं नटलेली सरिता तु
तर कधी विविधांगी रचनांनी बहरलेली आयुष्यलतिका तु देसी सदा स्व-सत्वानं आम्हाला नाविण्यतेचा वसा तु कधी शुद्ध चारित्र्याची खाण तु तर कधी अश्लीलतेची चादर मजबुरीने ओढलेली वेश्यारूपी जिवंत असलेली प्रेतशिळा तु दोन्ही रूपात सदा वससी ऐसी विविधतेनं नटलेली तेजशलाका तु
तुच असे नविन स्वप्नांचा जागर असे देवानं घडवलेलं सुंदर महाकाव्यरूपी शिल्प तु तुच असे सर्व जाणीवांचं आगर सर्व भावनायुक्त असा आत्मईशरूपी सागर तु तरीही मज सदा प्रश्न पडे हा सारखा
सर्वश्रेष्ठशक्ती युक्त अशी असुनही नारी सबला की अबला तु..??

©शब्दवेडा किशोर #स्त्रीजन्म

Richa Mishra

प्रलय के पश्चात 
जब हुआ निर्माण 
सृष्टि का ____
तब ईश्वर ने 
सक्षम बनाया 
स्त्री को ____
उसमें भरी नैतिकता ;
और प्रदान किया
समस्याओं से 
निपटाने की 
सहनशीलता !

ईश्वर ने रचा 
पुरुष और स्त्री को 
समान रूप से ;
पूर्ण रूप से 
बनाया सहनशील 
स्त्री को 
ताकि कभी भी
उदय हो पितृसत्ता का
स्त्री उसे सहन कर सकें !!


— % & #स्त्रीअस्तित्व 
#स्त्रीत्व 
#स्त्री_सम्मान 
#स्त्रीजन्म

Richa Mishra

प्रलय के पश्चात 
जब हुआ निर्माण 
सृष्टि का ____
तब ईश्वर ने 
सक्षम बनाया 
स्त्री को ____
उसमें भरी नैतिकता ;
और प्रदान किया
समस्याओं से 
निपटाने की 
सहनशीलता !

ईश्वर ने रचा 
पुरुष और स्त्री को 
समान रूप से ;
पूर्ण रूप से 
बनाया सहनशील 
स्त्री को 
ताकि कभी भी
उदय हो पितृसत्ता का
स्त्री उसे सहन कर सकें !!


— % & #स्त्रीअस्तित्व 
#स्त्रीत्व 
#स्त्री_सम्मान 
#स्त्रीजन्म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जन्म... #स्त्रीजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म हे असेच असते सर्वांच्या सुखासाठी झगडावे लागते,
स्वतःला झालेले दुःख विसरून इतरांसाठी सर्व सहन करावे लागते.
स्त्री जन्म हे असेच असते नेहमीच कुणाची तरी होऊन जगावे लागते,
स्वतःची ओळख विसरून
कुणाचीसाठी आई,तर कुणासाठी बहीण म्हणून जगावे लागते.
स्त्री जन्म काय फक्त अशासाठीच असते,
की कुणाची मुलगी,कुणाची मैत्रीण तर अनोळखी अशा व्यक्तीसाठी 
त्याची अर्धांगिनी म्हणून जीवन जगावे लागते.
स्त्री जन्म नक्की कशासाठी असते,काय तिला तिची ओळख नसते.
त्याग आणि आत्मसमर्पणाचे दुसरे नाव स्त्री जन्म आहे,
पुरुषांच्या मर्द पणाची ती जननी आहे. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जन्म...
#स्त्रीजन्म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जन्म... #स्त्रीजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्रीजन्म

read more
अहंकारी आणि गर्विष्ठ अशा 
काही पुरुष प्रधान संस्कृतीचा 
माज उतरविण्यासाठी,
अफाट शक्ती व अमाप सहनशक्तीचा,
योग्य समतोल असलेला स्त्री जन्म असतो. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जन्म...
#स्त्रीजन्म

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे स्त्री जन्म... #स्त्रीजन्म #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्त्री जन्म म्हणजे नेहमीच संघर्ष असतो
समाजासमोर कितीही चांगले वागले तरी त्यांच्या विचारसारणीत काही फरक नसतो. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे

स्त्री जन्म...
#स्त्रीजन्म


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile