Find the Best shashitile Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shashi Tile
असं म्हणतात की माणसाने माणसामध्ये भिंत उभी करू नये, पण काही माणसाचं जर माणसा सारखी न वागता जनावरा सारखी वागणार असेल तर त्यांच्या मध्ये भिंत उभी करायला काय हरकत आहे.. या जगात प्रत्येकाला आनंदी राहण्याचा आधीकार आहे, जर कुणी नात्याचा गैर फायदा घेऊन आपल्या आनंदावर, स्वप्नावर विरजण टाकणार असेल तर त्याच्याशी नातं जोडण्यात अर्थ नाही.. नातं टिकवण्याचा ठेका घेण्यापेक्षा आपल्या हितैषी सोबत आयुष्य सुंदर करण्याचा विडा उचला.. मग पहा विचार करून, कोणत्या नात्यात भिंत बांधायची का सेतू बांधायचा ते ! ! ! ! #marathi #quotes #nojoto #shashitile
#marathi #Quotes nojoto #shashitile
read moreShashi Tile
"ज्याचा क्षय होत नाही तो अक्षय" या सृष्टीत प्रत्येक गोष्ट ही कधी ना कधी नष्ट होते, पण नष्ट होत नाही ते फक्त अन् फक्त आत्मज्ञान.. मी कोण? मी कोणाचा? मी कोणासाठी? ह्याचे उत्तर ज्याच्याकडे तोच आत्मज्ञानी आणि बाकीच्यांचे जीवन म्हणजे जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला. मग पहा विचार करून, अक्षय तृतीया च्या निमित्ताने आत्मज्ञान प्राप्त करता येते का ते ! ! ! #marathi #quotes #akashytrutiya #nojotoo #shashitile
#marathi #Quotes #akashytrutiya #Nojotoo #shashitile
read moreShashi Tile
आज प्रत्येकाची आवस्था ही पिंजऱ्यात राहणाऱ्या पक्ष्याप्रमाणे, खायला पेयला मज्जा करायला भेटते, पण इतर पक्ष्या प्रमाणे मुक्तपणे उडता येत नाही. उडायचं म्हटलं तर त्याचंच विश्व हे त्यांना आडवं येते.. प्रत्येकाने स्वतःला त्यांचाच विश्वात यर्थात पिंजऱ्यात कैद केले. ह्या पिंजरा म्हणजे त्यांचा गरजा पूर्ण करणारा व्यासपीठ, गरजा पूर्ण करण्याचा नादात स्वप्न पूर्ण करायचं तर सोडा साधी स्वप्न पहायची सुद्धा राहून गेलीत.. आज वेळ आली स्वप्न पाहण्याची, स्वतःवर आणि स्वप्नावर विश्वास ठेवण्याची... मग पहा विचार करून स्वतःला कधी मुक्त करायचं ते ! ! ! ! #nojoto #marathi #quotes #vichar #shashitile
nojoto #marathi #Quotes #vichar #shashitile
read moreShashi Tile
आपण कोण आहोत? हे आपलं चारित्रच सांगत असतं.. #marathi #quote #shashitile
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited