Nojoto: Largest Storytelling Platform

Best ती Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best ती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about सावन तीज कब की है, ज्योति तीव्रता का मात्रक क्या है, love तीन पेग बलिए, हरतालिका तीज कब है, तीरन से काटे तीरन को lyrics,

  • 254 Followers
  • 852 Stories

Ajay Chaurasiya

तिने विचारलं,
प्रेम म्हणजे काय ?
मी म्हणालो, 
आकाशात असलेल्या चंद्राला बघून,
ज्याची आठवण यावी, ते प्रेम...
मग तिने विचारलं,
आठवण म्हणजे काय ?
मी म्हणालो,
कशी ही असली परिस्तिथी,
तरीही सोबत असते , ती आठवण...
ती हसली आणि म्हणाली,
जर आठवणी ने माणूस सोबत असतो,
तर आपण वाट का पाहतो ?
आणि वाट म्हणजे काय?
मी म्हणालो,
जसं आपण चित्रपटात आपल्या आवडत्या पात्राची कलाकारी
बघायला पूर्ण चित्रपट पाहतो,
तसंच आपल्या जीवनाच्या ही चित्रपटात एक पात्र असं असतं,
ज्याची वाट आपण नेहमी बघत असतो....
मग ती म्हणाली,
तुझ्या जीवनाच्या चित्रपटात माझी जागा कुठे ?
मी म्हणालो "हृदयात", पण मनातल्या मनात....

©Ajay Chaurasiya #ती

Saumitra Joshi

#ती शय्या मखमालीची #DearKanha

read more
ती शय्या मखमालीची
राधेस टोचते आता,
का कान्हा वळला नाही 
यावेळी जाता जाता!

माझ्याहुन काय असावे
कान्हासी इतके प्रिय?
पाव्याला जागच नाही
सुर निजून गेले काय?

धूसरशी काळी छाया
मग पडली अंगावरती
ते कुरुक्षेत्र का नाचे
त्याच्या अन माझ्याभवती

तो तिथेच अडकुन पडला
पार्थाच्या मोहापायी
गीतेच्या जन्मापुढती
राधेची यादच नाही.

ती येते सौधावरती
मग थेट गवाक्षी जाते
ती भिरभिरते एकाकी
कान्ह्याची वाट पहाते.

@गुढ

©Saumitra Joshi #ती शय्या मखमालीची 
#DearKanha

Kunal Salve

तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल तुझी परवानगी असेल तर तुलाच ..... #pc_google #गजरा #ती #आणि #मी #प्रेम #Collab #marathiquotes

read more
इतकी साधी ती ...

येतांना तुझी वेळ, काम नको आणू
फक्त नजर आणि शब्द घेऊन येशील 
मी आज केसांत गजरा माळलाय
तु मला सोबत घेऊन जाशील ? 

इतका असा मी ...

सर्व काही ठीक राणी 
शब्द,नजर तुझेच असतील 
तु केसांत जर गजरा माळलास तर,
माझी जाण्याची तु काय हमी घेशील ? तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल 
तुझी परवानगी असेल तर तुलाच .....

#pc_google 
#गजरा 
#ती 
#आणि #मी 
#प्रेम

Kunal Salve

नको असलेला पाऊस किती बेचैन करतो
तुझी ती नाही आली का परतून ?बोलून
आसवांना माझ्या मुसळधार बरसवतो ! #पाऊस 
#ती 
#प्रेम

Kunal Salve

तुला आठवत असतो मी दिवस रात्र 
आठवणीत तु माझी होऊन जातेस 
सुरू असतं शब्दाचं ओठी येण्याचं सत्र 
येतेस जेव्हा ऐकायला तेव्हा ऊन,वारा भासतेस  ! #आठवण 
#ती 
#ऊन #वारा 
#मराठी

Kunal Salve

एक कॉफी तिच्यासोबत पितांना 
गार केल्या गार नव्हती होत
मी पाहिले तिच्या ओठांना जेव्हा 
मग कळलं ही तर कॉफी हॉट !  #कॉफी
#ती  
#हॉट

Kunal Salve

#एक #ती

read more
आयुष्यातील तिला विसरायला 
आयुष्यात एक नवीन ती हवी 
आयुष्यातील भूतकाळाला विसरायला 
एक नवीन संधी तिनं प्रामाणिक द्यावी ! #एक #ती

Kunal Salve

विचार #pc_Kb salve
#एकांत #विचार #ती

Kunal Salve

आज ती जाम रुसली होती 
रुसली होती खरी पण,
जाम पेक्षा कमी दिसत नव्हती ! 😍😘😘 #ती 
#रुसवा

Kunal Salve

ती आहे त्याची_
ती आहे त्याची आता काय बोलणं 
मी माझीच आता प्रेमकथा पानावर मांडणं
काय तिला बोलायचं काय दोष उगाच द्यायचा
प्रेम विसरून आता तिरस्कार माझाच मी करायचा
आहे सुखी त्याच्यासोबत ती मस्त
तिच्या शपथा वचनं खोटी,तिच्यात मला केलं होतं व्यस्त
आज तिची सावली त्याच्यासोबत चालते,
माझी सावली मात्र मी हरवलेल्या मला,
मला अजूनही तिच्यात शोधते●●● kunal_ove



 #ती #आहें #त्याची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile