Nojoto: Largest Storytelling Platform

Best स्वातंत्र्य Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best स्वातंत्र्य Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutस्वातंत्र्य दिन शायरी मराठी, कितवा स्वातंत्र्य दिन आहे 2019, कितवा स्वातंत्र्य दिन आहे, मराठी शायरी स्वातंत्र्य दिन, स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश,

  • 7 Followers
  • 11 Stories

Shankar Kamble

साचलेले बरेचं काही
खोल मनाच्या गूढ तळाशी
गाठ उकलण्या सैल धागे
सोड मौन तू बोल स्वतःशी..

काजळ काळे भरले अंबर
अवचित आली वळीवाची सर
जीर्ण पानगळ त्यागून आता
नवलाईचा फुलू दे मोहर..

द्यूत रंगले मनःपटलावर
मनाजोगते दान पडेना
चितारलेले चित्र देखणे
कुठे हरवले?का सापडेना?

नजरेला दे नजर तुझ्या तू
दर्पणात निरखून स्वतःला
घे भरूनी पोलाद मनगटी
चेतवून बघ सामर्थ्याला..

पाझरते बघ एकसारखी
अथांग थरथर स्पंदनाची
तख्त पालथे निशाण फडके
आव्हान ,गर्जना दे बंडाची..

©Shankar Kamble #SunSet #मन #तळ #बोला #मोकळे #आकाश #स्वातंत्र्य #पंख #वारा

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕🙏 जानेवारी महिना आला कि वेध लागते ते प्रजासत्ताक दिनाची. सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा. या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती? हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो. चला तर मग आजचा विषय आहे खरचं स्वतंत्र आहे का ती?

read more
(कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे)

मुली आज प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबर उभ्या आहेत,
खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत 
तरीही ती मुलगी आहे म्हणून मुली सारखीच वागणूक दिली जाते.
मुलगी शिकली प्रगती झाली हे फक्त ऐकायला नि वाचायला मिळते 
कारण जेव्हा जेव्हा ती प्रगतीच्या वाटेवर असते तिला मागे खेचले जाते.
स्वातंत्र्य देशात प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते मग मुलींनाच का डिवचले जाते.
मुलगी आहेस तू अशी एकटीच घराबाहेर फिरू नकोस,
जमाना वाईट आहे,लोकांच्या नजरा खराब आहे,असे ऐकवले जाते.
असे ऐकताना कुठे स्वातंत्र्य आहे मनी हे विचार येते....
[ read in caption ] लेखकानों💕🙏
जानेवारी महिना आला कि वेध लागते ते 
प्रजासत्ताक दिनाची.
सर्वांना राष्ट्रीय बालिका दिवसाच्या खुप शुभेच्छा.
या एकविसाव्या दशकात खरचं स्वतंत्र आहे का ती?
हा प्रश्न मला नेहमी भांडावुन सोडतो.
चला तर मग आजचा विषय आहे
खरचं स्वतंत्र आहे का ती?

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वातंत्र्य... #स्वातंत्र्य चला तर मग लिहुया. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
स्वातंत्र्य ते नव्हे जे आज आपण जगतोय,
मनमानी करत मनात येईल तसे वागतोय.
दिले ज्यांनी बलिदान स्वातंत्र्यासाठी त्यांना मात्र विसरतोय,
आणि नेहमीच्या सुट्टीत अजून एक सुट्टीची भर म्हणून कुठेही फिरायला जातोय.
तसे पाहता आपण अजूनही गुलामगिरीच्याच विळख्यात आहोत,
इंग्रजांकडून सुटलोय पण आपल्यातच अडकून आहोत.
खरे स्वातंत्र्य कशाला म्हणावे ?
तर मनापासून याद करावे स्वातंत्र्यवीरांना आणि त्यांचे बलिदान आठवावे.
अडकलोय अजूनही ज्या जातीपातीच्या विळख्यात त्यातून मुक्त व्हावे,
सर्वधर्मसमभाव जाणुनी आपण सर्व एकच आहोत असे समजुनी राहावे.
स्वातंत्र्य हे फक्त एक नाव आहे जे स्वतः गुलाम आहे,
इथे प्रत्येक स्वातंत्र्य लहान व्यक्ती हा मोठ्या व्यक्तीच्या दबावाखाली आहे.
खरे स्वातंत्र्य तेव्हा होईल जेव्हा हा फरक निघून जाईल,
कुठलाही भेदभाव नसताना सर्व समसमान आहे हे समजले जाईल. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
स्वातंत्र्य...
#स्वातंत्र्य 
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय जरा वेगळा आहे तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे. चला तर मग लिहुया... #माझ्यासाठीस्वातंत्र्य #स्वातंत्र्य #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे..
काय असतं हे स्वातंत्र्य ?
लहानपणापासून वाचतोय,ऐकतोय
इसवी सन पूर्वी आपण स्वातंत्र्य झालो
देश स्वातंत्र झाला,
म्हणजे नक्की काय झालं..
गुलामगिरी तुन मुक्त होणे म्हणजे
स्वातंत्र्य होय का ?
इथे मुक्त तर सर्वच आहेत पण स्वातंत्र्य कुणीच नाही,
इथे प्रत्येक जण स्वतःच्या पदाचा वापर पाहिजे तसा करून घेतात
कुणी मोठ्या पदाच्या व्यक्तीच्या ओळखीचा वापर करून घेतात
तर कुणी स्वतःच्या दादागिरी चा वापर करतात नि पाहिजे तसे वागतात.
ह्या अश्या लोकांपासून स्वातंत्र्य पाहिजे
मनात खूप काही असत पण कुणाच्या दबावाखाली लपून राहत
ह्या दबावातून स्वातंत्र्य पाहिजे.
स्वतःच्या द्विधा मनस्थितून स्वातंत्र्य पाहिजे
मनात येईल तस वागायचं स्वातंत्र्य पाहिजे.. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय जरा वेगळा आहे
तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे.
चला तर मग लिहुया...
#माझ्यासाठीस्वातंत्र्य 
#स्वातंत्र्य 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

Shankar kamble

समर शंख फुंकले ,निनादे
झडली नौबत, शिंग, तुतारी
देशप्रेम उसळो धमन्यातून
जयभारत जय द्या ललकारी।१।

वीर सपूतांच्या रक्ताने
पावन स्वातंत्र्याची गाथा
स्मरतो, जपतो पुन्हा नव्याने
त्याग, शौर्या झुकतो माथा।२।

यज्ञकुंड पेटला क्रांतीचा
वाहिली समीधा सर्वस्वाची
बलिदानाच्या वेदीवरती 
शेज सजली नरवीरांची।३।

खळाखळा तोडल्या शृंखला
बंदीवासे मुक्त माता
सप्तकोटी कंठातून घुमती
विजयाचे स्वर अन जयगीता।४।

शपथ तुम्हाला मायभूमीची
आण असें त्या राष्ट्रवीरांची
नको फितुरी अन गद्दारी
नको गुलामी आता कुणाची।५।

जोवर असती नभांगणी
हा चंद्र, सूर्य हे तारे
फडकत राही प्रिय तिरंगा
हिमालयाच्या शिखरे।६।

©Shankar kamble #भारत 
#स्वातंत्र्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा 
#स्वातंत्र्य 
#देशप्रेम 
#देश 
#भारतीय 
#बलिदान 
#क्रांती

vikrant shelke, zankar

लोकशाही वाचवायचीय ........ बांडगुळांच्या बलात्काराने देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय लोकशाही वाचवायचीय भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून

read more
संविधानाचा मर्डर करून
आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय..........

विक्रांत शेळके,मावळ
७३५०८८५७३४ लोकशाही वाचवायचीय ........

बांडगुळांच्या बलात्काराने
देशाची व्यवस्था गर्भार राहिलीये
अन संविधानाचा मर्डर करून आम्ही म्हणतोय
लोकशाही वाचवायचीय

भडव्यांच्या भ्रष्टाचाराचे रोज पारावर बसून

Sarita Sawant

डोक्यावर पदर म्हणजे बाई राखते सन्मान
पडलाच चुकून खाली की झालाच अवमान

डोक्यावर पदर म्हणजे ती शालीन
नाहीच घेतला तर ती झालीच असंस्कारी

डोक्यावर पदर म्हणजे जपली संस्कृती
नाहीतर खाल्लीच तिने माती

डोक्यावर पदर,खाली मान शोभली पाहिजे ती संस्कारी बाहुली
फुटलाच कंठ तिला की झाली संस्कारांची पायमल्ली

सारला पदर बाजूला, पाऊल टाकले उंबराठ्याबाहेर
की मिळालीच धुळीला इज्जत

डोक्यावरचा पदर सावरून सावरते संसार ती
विचारा तिलाही कधीतरी काय हवंय तुला बाई 

मोकळ्या आभाळाशिवाय काही मागायची नाही ती
मिळुद्या पदरावीण मुक्ती तिलाही

जखडून ठेवलेल्या रुढीत जखडत तिच अस्तित्व
घेउद्या जरा मोकळा श्वास तिला

जगुद्या तिचा तिला स्वाभिमान
झुकवणार नाही ती तुमची मान. #स्त्री #स्वातंत्र्य #मराठीकविता

VoiceKraft09

ह्या स्वातंत्र्य दिना पासून फक्त नागरिकत्व म्हणून भारतीय नाही, तर खरे भारतीय म्हणून जगू...🙏 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☺🇮🇳 New Audio|Video|Poem out @ VoiceKraft09- 🇮🇳भारतीय🇮🇳 Voiceover by - Kamalakar Lokhande

read more
ह्या स्वातंत्र्य दिना पासून फक्त नागरिकत्व म्हणून भारतीय नाही, तर खरे भारतीय म्हणून जगू...🙏

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा☺🇮🇳


New Audio|Video|Poem out @
VoiceKraft09- 🇮🇳भारतीय🇮🇳
Voiceover by - Kamalakar Lokhande

रजनीश "स्वच्छंद"

स्वातंत्र्य भाव वर्णन।। ये शीश तर्पित आज है, ये वीर वर्णित आज है। कण कण लहु में ज्वार है, ये काव्य छन्दित आज है। कम्पित नहीं हुंकार है,

read more
स्वातंत्र्य भाव वर्णन।।

ये शीश तर्पित आज है,
ये वीर वर्णित आज है।
कण कण लहु में ज्वार है,
ये काव्य छन्दित आज है।

कम्पित नहीं हुंकार है,
वाणी में भी ललकार है।
कोटि कोटि स्वजनों में,
आह्लादित ये जयकार है।

ये भाव स्तंभित आज है,
ये जग अचंभित आज है।
जो पूत तेरे बढ़ चले,
सृष्टि भी कम्पित आज है।

ये धीर अंगद पांव है,
रौद्र मन का ही ठाँव है।
हम अडिग जो हैं खड़े,
मातृ आँचल की छांव है।

वो वीर जो सरहद डटे,
हैं धूप बारीश जो खड़े।
उनको नमन पभु आज है,
जो देश ख़ातिर है लड़े।

स्वातंत्र्य वेदी है ये पावन,
है गूंजता जो मुक्त गायन।
खग विहग तरु ताल नदियां,
हैं झूमते मानो हो सावन।

स्वरचित जन भाव संचित,
दारिद्र्य-रहित, न कोई वंचित।
मुक्ति स्वर नभ में जो गूंजा,
पुनः हुआ ये प्रण स्पंदित।

ये दृष्टि लक्षित आज है,
ये सार गर्भित आज है।
ये शीश तर्पित आज है,
ये वीर वर्णित आज है।।

©रजनीश "स्वछंद" स्वातंत्र्य भाव वर्णन।।

ये शीश तर्पित आज है,
ये वीर वर्णित आज है।
कण कण लहु में ज्वार है,
ये काव्य छन्दित आज है।

कम्पित नहीं हुंकार है,

Sarita Sawant

ती एक साधीशी, सरळ,सूंदर
स्वतःमध्येच मग्न असणारी
मोजकच बोलणारी,लोभस हसणारी
उराशी खूप स्वप्न बाळगणारी
अन स्वप्नातच जगणारी
फार अपेक्षा नसणारी
छोट्या विश्वातही समाधानी राहणारी
तीच घरच सारं तिचं जग असणारी
या जगासाठी सगळं काही त्यागणारी
अन वेळ आल्यास हवं ते करणारी
एका वळणावर नव्या घरात पाऊल ठेवणारी
अन प्रेमाने घर बांधणारी
आईपणासाठी कळा सोसणारी
अन मुलाच्या बालपणासाठी करिअरही मागे सोडणारी
घराचं वात्सल्य जपणारी
अन घरावर संकट आल्यास दुर्गा अवतार घेणारी ती
ती असते जोडीदाराचा कणखर आधार
तिच्याशिवाय नाही होत सुखी संसार
तीच असते वृद्धापकाळातली काठी
अन मुलांची सावलीही तीच
ती असते सगळ्यांचा अभिमान
प्रसंगी तिला गहाण ठेवावा लागतो स्वाभिमान
ती आहेच अनाकलनीय
ती आहेच अदभूत
आहे ती तुमच्या माझ्यातली ती

सरिता सावंत #स्त्रीजीवन #स्वातंत्र्य #अस्तित्व #ती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile