Find the Best असताना Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
sandeep wagh
#हरवलेल्या #शब्दांना #येतात #असताना.. #तुझ्या #खूप #साऱ्या #आठवणी #येतात.. ह्रदयाला भिडून मनातच विरून जातात. #मनमुक्तपाखरू
read moreRutuja Dorwat
कुणी म्हणतं की काय तो एक चित्रकार आहे मामुली, कुणी म्हणत ती काही फुटकळ लिहीत बसते, कुणी म्हणतं वेळेची बरबादी करतो तो, कुणी म्हणत की दुसरं काही जमत नाही म्हणून करतो हे तो, लोक काय म्हणत रहातात हो, काही वाईट गोष्टी बोचणाऱ्या, तो शृंखला चितारतो हो पिंजऱ्यात बंद असताना, ती करते शब्दसाधना शब्द संपलेले असताना, कोण सांगणार त्या शिकलेल्यांना अभिनय सोपा नसतो, कोण सांगणार नुसतं फोटो काढणं आणि चांगला फोटो यात फरक असतो, अहो कलाकाराचं दान घेणं सोपं नाही, उगाच कुणीही उठून कलाकार बनत नाही, आधी जखम करून घ्यावी लागते, त्यावर पाणी मारून ती चिघळावी लागते, जखमेवर मीठ चोळलं की जखम परत भळभळते, त्याच जखमेच भांडवल जगाच्या बाजारात केलं, की उपाधी कलाकार मिळते। कलाकार होणं सोप्प नाही हो, फक्त कलेचं वेड जपता आलं पाहिजे। - ऋतुगंधा #art #artist
Trishila Salve
रहा जवळी असा तू ,ही साथ सुटताना वाच आता तरी तू ,मी मिटत जात असताना... रहा हसत असा तू, दूर जात असताना लिही आता तरी तू ,मी झिजून जाताना... कामात मग्न तूही ,होता नेहमीच कैसा वेळ काढ जरासा ,मी वेळ मोजताना शुष्क झालेले अश्रू,तुज दिसलेच का नाही वाहू दे जरासा ओलावा ,मी हुंदका दाबताना... नको राहूस स्तब्ध, मी शांत होताना हो जरासा गदगद ,मी चितेवरी जळताना मी चितेवरी जळताना... 🙏🙏त्रिशिला🙏🙏 कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे#
कविता जीवनाची कवयित्री त्रिशिला साळवे# #poem
read morePallavi Phadnis
आभाळात एवढा चांदणसडा असताना तुला मात्र माझा चेहरा पहावसा वाटतो, एवढा असताना चंदेरी प्रकाश पण तुला मात्र माझ्या डोळ्यात दिसते चमकणारे आकाश असताना हवेत इतका शितल गारवा,तू मात्र घेत असतो माझ्या स्पर्श्याचा अलगद विसावा चंद्र आणि चांदण्यांचा पाठशिवणीचा खेळ चालतो,तू मात्र माझ्याशी लपाछपी खेळतो तुला मी कधीच नाही दिसत मी जशी आहे तशी मला पाहतच नाही ,तूला माझ्यातच हसरे चांदणे दिसते,आणि मी ही माझ्या हातांच्या कवाडाआडून लडिवाळ लाजते पल्लवी फडणीस ,भोर✍
Raj Tidke Patil
न जाने कित्येक वर्ष राहीलो मित्र म्हणून एकत्र तरी कळालीच नाही तुला माझी वेदना , खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. . शब्द तुझा कधी नाही तोडला , तरी नव्हती जाणली तु माझी भावना , खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. . रात्र गेली दिवस गेला गेले कित्येक आठवडे नी महिना , आजही ह्रदयामध्ये दिसते तुझीच प्रतिमा .. खरंच मी तुझाच होतो तुझ्या सोबत असताना .. - Raj Tidke .. तुझ्या सोबत असताना ..
तुझ्या सोबत असताना ..
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited