Nojoto: Largest Storytelling Platform

Best देह Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best देह Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutदेहली तो हल्का है, देहनी meaning in hindi, देहांत की खबर, 'फीकी चुनरी देह की', देहगुहा के प्रकार,

  • 75 Followers
  • 350 Stories

Shivkumar barman

#रेत में... न #देह में... न #मन मे ... न #अहसास में.. न #जिस्म में... #इश्क तो बस सिमट जाता है, सिर्फ और सिर्फ रूह में...! न आयत में..

read more
White न रेत में... 
न देह में...
न मन मे ... 
न अहसास में..
न जिस्म में...
इश्क तो बस सिमट जाता है,
सिर्फ और सिर्फ रूह में...!
न आयत में.. 
न इनायत में....
न चाहत में .. 
न ख्वाहिश में..
इश्क़ तो बसता है सिर्फ रूह की इबादत में..!!

©Shivkumar barman
  न #रेत  में... 
न #देह  में...
न #मन  मे ... 
न #अहसास  में..
न #जिस्म  में...
#इश्क  तो बस सिमट जाता है,
सिर्फ और सिर्फ रूह में...!
न आयत में..

अदनासा-

anamika

'मनु' poetry -ek-khayaal

शब्दवेडा किशोर

#देह नश्वर आत्मा तोचि असे अंशईश्वर....
कुणी आधी कुणी नंतर देवाकडून जन्म घेऊनी पुन्हा
निजधामाला जातसे परी एक तो आत्मा अमर
जन्म न घेतो नाश न होतो एकच आत्मा असे चराचर
मनात माझ्या असेल अत्तर गंध पखरतो तोच निरंतर
म्हणून हसतो मला पाहुनी अनोळखी असे कुणी पत्थर
स्पर्शाचे हो कसे आकलन कुठून येती शब्दांचे ते अमाप घन
जीवास चेतना कशी मिळे ती जरा करावे याचे
सम सकलांनी चिंतन
ओठावरचे हसू ते लाघवी क्षीण वेदना ती करी मानवी
कशी समजते अलगद उरी सलणारी वेदना
दुजा कुणाची बात सहज जाणवी अपुल्या मना
आत्म्याचे ते आत्म्याशी अतुट असे विलक्षण बंधन
कुणा न कळले कोण चिरंतन परमात्मा जो देही वसतो
सहज सोडतो तो हे देही बंधन मुक्ती मिळते मग ती देहाला
भोग वेदना त्या साऱ्या असे आत्म्याला
हा देह सोडुनी जाई आत्मा दुसऱ्या देही पुन्हा जगणे असे
नित्य निरंतर ते आत्म्याला
परमात्म्याशी तदाकार जर झाला आत्मा नसे मग तयास अंतर
तरी कदाचित मिळेल मुक्ती आत्मा परमात्मा मिटेल मग अंतर
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #काया_विठ्ठल_आत्मा_पांडूरंग

शब्दवेडा किशोर

#देह कुडी एक रंग....
देह कुडी एक रंग जयास
असे तयास विठ्ठलरूपी आत्म्याचाही संग
हाडामासाचा तिथं पिंजरा केला
आत सुंदर राघु बैसविला
राघु मोठा ग्यानी ज्ञानी 
बोली बोले मंजुळ वाणी 
एके समयी अनाहूतपणे राघु उडूनिया दुरदेशी गेला 
तयाचा पिंजरा मग मातीत लोटला 
चार घटका तयाचिया नामाचा शोक आप्तांनी केला 
काळाच्या पडद्याआड कुडीचा पिंजरा जव लोटला
तव प्रत्येकजण तयास विसरूनी तयामागे उरलेल्या
संपत्तीवर तुटुनिया पडला 
जन्मा जो येणार तो एक दिवस भाग्यरेषेच्या
भाकीतावर मरणासही सामोरं गेला
तयामागे कुणीच फार शोक ना केला 
कुडीतुन पंचप्राण जाण्याच्या काही क्षणभरातच
माघारी उरलेल्यांनी तयाच्या संपत्तीचा लोभ धरावा
अन् रागरुसवा करावा
हाच मग नवा पायंडा पडला
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देह_कुडी_एक_रंग_जयास

Vivek

#देह पे आसमां

read more

'मनु' poetry -ek-khayaal

Shankar Kamble

शोधून सापडेना ही वाट हरवली जेंव्हा
परतुन पावलांचा कुणी माग काढतो तेंव्हा..

थबकून तळ्याच्या काठी का पूर आसवे ढाळी?
गर्भार सावल्या पंक्ती लेणे मिरवती कपाळी..

पाचूने जडले होते मोहरले पान दवाचे
दैवात अवेळी सुकणे बोचते शल्य कशाचे?

सांधला बांध मनाचा स्पुंदतो श्रावण डोळा
कुरतडले कोंब कधीचे तरतरला खोल उमाळा..

हळूवार घालते साद दूरदेशी रुसला रावा
पंख यावे मजं भाबडी गंध रातराणी न्यावा..

निसटून चालले श्वास राहिले भास कोरडे
वळीवाच्या चार सरींना रान आतुर का एवढे?

©Shankar Kamble #Alive #वाट #वाटते #भास #सखी #भाव #देह #लाज #प्रेम

शब्दवेडा किशोर

#देह मातीचा रे गाडगा
देह मातीचा रे गाडगा तो मातीतंच जाणार मातीतुनी जन्मा आला
त्याचा मातीतंच तयाचा अंत हा होणार
तुझ्या माझ्या देहाची सारखीच माती
जग कुंभाराचे चाक ते नित्य फिरे गरगर
देव कुंभार रे नेक सदा सत्वपरिक्षा तो घेत राहणार
देवासाठी असे साऱ्या विश्वाचे अंगण
देव कारागीर मोठा राशीवर रास चढवी
नसे कामाला रे तोटा
आधी माती सडवितो जळमाजि कालवितो
गर्भकोश रे मातेचा मगआवा बनुनीया जातो
नऊ दिस नऊ मास दैवचक्र वेगे दौडत राही
देवाची बोटं लीलया फिरती गोळा आकारास येई
प्राण फुंकर मारतो अग्निमाजि तापवितो
भट्टी अचुक जमता गडु आकार हा घेई
किती गाडगी मडकी नाना परी नाना अस्तित्वे
घेऊनीया भाग्य येती त्यांची नानाविध रूपे
ललाटीचा भोग ज्याचा त्याचा असे जैसा तैसा
होत असे प्रत्येकाचा संचार तैसा
दैवगती ना कधी कळते ना कळली इथं कुणास
दैवत्वासमोर या जगीचे असे सर्वच लाचार
जन्मा येई कुणी घेऊनी हंडा मोतीयांचा
तर कुणी होई धनी सदा भडाग्नीचा
कुणा मिळे शितलता तर
कुणाच्या वाट्याला येई विस्तवाच्या खाणी
जे काय पडले पदरी तयाचा करूनीया स्विकार
कर्मबंधाची ही शिदोरी ज्याची त्याची
ज्याला त्याला न्यावी लागेल अंती पार
नको हुरळुन जाऊ नको करू हा फुकाचा रे माज
तुझा जन्म असे मातीचे मडके
तयाचा शेवटही असे मातीचेच खापर
जन्ममरणाचा हा अनोखा प्रवास
चालतसे सदा मातीतुन मातीकडे
वृथा मोह वृथा देह सांभाळी सारेच जन
सदा इथं असे सारेच रे जगण्यासाठीच रे वेडे
देह मातीचा रे गाडगा तो मातीतंच जाणार
मातीतुनी जन्म झाला त्याचा
मातीतंच तयाचा अंत हा होणार
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #देह_मातीचा_गाडगा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile