Nojoto: Largest Storytelling Platform

New वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी.

Stories related to वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी

    LatestPopularVideo

Devanand Jadhav

•ज्ञानेश्वरी• #मराठीपौराणिक

read more
🌞🕉️ 🙏🏻 सुप्रभात 🙏🏻 🕉️ 🌞
°🕉️•॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥•🕉️° 
॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 
            ॥ अर्जुनविषादयोगः ॥ 
॥ अथ प्रथमोऽध्यायः–अध्याय पहिला ॥ 
•••पुढे चालू...••• 

हें नेणसी तूं कवण ।
परी पैल भीष्म द्रोण ।
जयांचे उपकार असाधारण ।
आम्हां बहुत ॥ २२२ ॥
हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का ? 
ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत 
असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. ॥१-२२२॥

एथ शालक सासरे मातुळ ।
आणि बंधु कीं हे सकळ ।
पुत्र नातू केवळ ।
इष्टही असती ॥ २२३ ॥
येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे 
आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू 
आणि केवळ इष्टही आहेत. ॥१-२२३॥

अवधारी अति जवळिकेचे ।
हे सकळही सोयरे आमुचे ।
म्हणौनि दोष आथी वाचे ।
बोलितांचि ॥ २२४ ॥
ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे 
सर्व सोयरे आहेत. आणि म्हणूनच (यांना मारावे असे) 
वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. ॥१-२२४॥
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

©Devanand Jadhav •ज्ञानेश्वरी•

Aarya Rathod

ज्ञानेश्वरी...

read more
*ज्ञानेस्वरी*
     
  ज्ञानाचा घड़ा भरूनी
तेराव्या शतकात माउली
        ज्ञानेश्वराने,
    ज्ञानेश्वरी लिहिली

  ज्ञानाचा घड़ा भरूनी
तेराव्या शतकात माउली
        ज्ञानेश्वराने,
    ज्ञानेश्वरी लिहिली
ते शब्द अमृता सारखे
      पावन झाले,

    युगे युगी ज्ञानेचा
      ज्योत लावूनी
          माउली,
   संत ज्ञानेश्वर झाले...
         
  _ अरविंद राठोड ज्ञानेश्वरी...

Mohan Somalkar

# डोळा #मराठीकविता

read more
डोळ्यात माझ्या भाव नवे...
ममता मायेची
गोड किती..!
पशुपक्षात दिसे
वात्सल्य प्रिती. !

डोळ्यात माझ्या भाव नवे
 प्राणिमात्रांत प्रेमळभाव !
माणसात कधी कधी
वाटे  त्याचा अभाव.!


आईच्या ह्रदयाला 
कोणत्याही पाझर फुटतो
जीव आपल्या पिल्यासाठी
प्रत्येक वेळी तळमळतो.!

जीव गुंतलेला 
काळजी मग तिचे रडते
पिल्यासाठी आई
बघा किती धडधडते..!

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar # डोळा

nisha Kharatshinde

दुमदुमली पंढरी अवघी #Poetry

read more
दुमदुमली पंढरी अवघी

दुमदुमली पंढरी अवघी
आले वारकरी हरीहरी
घेऊनी तुळस डोई
नाचत आले दारी

तुझा महिमा अगाध 
मुखी नाम तुझेच विठ्ठला
गर्दीतही  होऊन‌‌ तल्लीन
जीव‌ तव चरणी अर्पिला

पहा चंद्रभागे तीरी‌ 
अंगणी पोहोचले वारकरी
भरूनी आले डोळे
पाहूनी तुझे रुप हरी हरी

ना भान ना तहान कसली
भक्तीरुपे भरीले पोट
दर्शन देऊन लेकरांस
सोड सुखरुप घरी..धरुनी बोट

✍️(निशा खरात/शिंदे)
      (काव्यनिश)

©nisha Kharatshinde दुमदुमली पंढरी अवघी

swanand

माय ज्ञानेश्वरी माऊली #Drops

read more
अथवा शरीराते सांडी । तह्री इंद्रियांची तांडी । 
हे आपणपयांसवें काढी । घेऊनि जाय ।। 
देह सोडतेवेळी जीवात्मा हा मन आणि इंद्रियांचा समुदाय आपल्या बरोबर घेऊन जातो 
देह हा इथेच सोडून जाणे आहे मात्र सोबत जे जात ते आपलं कर्म आणि जीवात्मा घेऊन जे जातो ते इंद्रिय म्हणून देहाच्या संबंधाने काही करण्याच्या ऐवजी इंद्रियांना योग्य वळण लावलं पाहिजे कारण सोबत हेच जाणार आहेत 
:-श्री माऊली .....

©swanand माय ज्ञानेश्वरी माऊली

#Drops

Tejz0560

vivek mokal

वाचली ज्ञानेश्वरी गायला हरिपाठ, तरी झाली ना कधी माणुसकीची गाठ. ©विवेक मोकळ #sadness #Life_experience

read more

vishnu thore

रानाचा डोळा देह आईंना पदर राहिना डोई वयपालखी वाहून नेण्या दिवस झाला भोई.... -विष्णू #nojotophoto

read more
 रानाचा डोळा
देह आईंना
पदर राहिना डोई
वयपालखी 
वाहून नेण्या
दिवस झाला भोई....
-विष्णू

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

read more
नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

pooja d

प्रतियोगिता 2 - विषय - प्रेमसुमन (चारोळी) नियम व अटींसाठी pin केलेली 1st पोस्ट पहावी. #प्रेमसुमन_२ #प्रतियोगिता_2_मराठी #marathiwriter yq #YourQuoteAndMine #yqtaai

read more
वाहिली प्रेमसुमने मी 
गुरू तुमच्या चरणांवर ।
द्यावी मज शक्ती करीन
मात मी हर एक संकटांवर ।। प्रतियोगिता 2 - विषय - प्रेमसुमन (चारोळी)

नियम व अटींसाठी pin केलेली 1st पोस्ट पहावी.

#प्रेमसुमन_२ #प्रतियोगिता_2_मराठी #marathiwriter #yq
loader
Home
Explore
Events
Notification
Profile