Find the Latest Status about गझल सूनाये from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गझल सूनाये.
Sudarshan Jadhav
White हम तो नीकल पडे he मंजिल की तरफ.. ये प्यार जताया नही जाता...l तेरे दर से निकले तो कहा जाये.. प्यार तुमसे हे ये बताया नही जाता... l मोहोब्बत के लिये कुछ खास दिल रखना पडता हे.. हम अनपढ लोगोंको क्यू ये पढाया नही जाता... l ये ओ एहसास हे जो दिलो-दिमाग मे बसता हे.. हर बार प्यार मे i love you बोला नही जाता... l ©Sudarshan Jadhav गझल
गझल #मराठीशायरी
read moreHarish Damodhar Naitam
गझल तुझ्या प्रीतीचा आहे मी भुकेला आता तरी तु भुक शमशील का || तुझ्या दर्शनासाठी फिरतो सैरावैरा आता तरी तुझे दर्शन घडवशील का || तुझ्या विना राहवत नाही मला नयनाला नयन भिडवशील का || माझ्या मनात सदा तुझेच विचार तुझ्या ह्रदयात मला ठेवशील का || स्वप्नात माझ्या वनवा पेटवलीस तु स्वप्न माझे पूर्ण करशील का || तुझ्या नयनात नकळत दिसतो होकार तुझ्या प्रीतीची साथ मला देशील का || तु दिसली कि शब्दच ओठांवर येईना अप्रत्यक्ष इशारा समजुन घेशील का || हात तुझा माझ्या हातात देउन नाते प्रेमाचे घट्ट जोडशील का || --- हरिष नैताम गझल
गझल
read moreGanesh Nagavade
धडे शिकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले धुणी धुवण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले तिथे दिसल्या मला तर मावलाया पूजलेल्या झरे बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले कुणी चुरगाळल्या की अत्तरे त्यांची बनवली फुले विकण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले स्वत:च्या सारखी कानात म्हातारी बरळते नदी धरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले हळद अन अक्षता दिसतात विहिरीच्या तळाशी घडा भरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले तहानेशी मुलींची भेट झाली का नव्याने हरिण बघण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले चरे दिसतात त्यांच्या आजही का चेह-यावर तडे बुजण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले कसे कुठल्याच विहिरीला अजुन नाही कळाले पुढे मरण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले कळ्यांच्या कोवळ्या ओठांस देठांनो विचारा फुले बनण्यास गेलेल्या मुलींचे काय झाले --गणेश नागवडे गझल
गझल
read moreप्रकाश साळवी
गझल : वृत्त : व्योमगंगा लगावली : गालगागा गालगागा गालगागा गालगागा काय देवा सांग पाहू अंतरंगी शोधताना का मनाचा भार वाहू बाह्यरंगी शोधताना ** का तरी रूपा तुझीया आळवावे डोळियांनी फूल व्हावे रे मनाने संतरंगी शोधताना ** जांभळ्या रंगात मी ही का असा रंगून जातो बोल का भांबावतो मी सप्तरंगी शोधताना ** तू असा का रे निलेशा शोधताना सापडेना शोधता शोधू कुठे मी कृष्णरंगी शोधताना ** ध्यास हा माझ्या मनीचा आसवे ही लोचनांची बंद झाली ही कवाडे मूकरंगी शोधताना ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ गझल
गझल
read moreकवी - के. गणेश
गझल.. जसजसे हे दुःख जेव्हा पचत जाते अडचणीवर मात करणे सुचत जाते ऐतखाऊ जीवनाला त्याग मित्रा भोगल्यावर वेदना पण रुचत जाते भाकरी अन तेल चटणी गोड मानू हाव सुद्धा सरण अपुले रचत जाते बंगल्याला रंग चढता लाल हिरवा झोपडी ती का उगा रे? खचत जाते झिंगलेल्या आज इथल्या माणसांना बघ गणेशा सरळ इच्छा लुचत जाते -------------------------------- © कवी गणेश खरात ९०२८११०५०९ ©कवी - के. गणेश गझल
गझल #मराठीशायरी
read moreकवी - के. गणेश
गझल.. आजची ही हार माझी अंत नाही खेळतो मी जीवनाशी खंत नाही तत्व सारे पाळतो मी वागताना दाखवाया बेगडी मी संत नाही झुंजला जो वेदनेच्या कारणांशी गौतमाची ती कथा रे, दंत नाही वेळ जाते, वेळ येते सावल्यांची धावणारा काळ सुद्धा संथ नाही उधळतो मी रोज आता शब्द माझे वाटतो पण, मी तसा धनवंत नाही """"""'''''""""""""""""""""""" © कवी के. गणेश ९०२८११०५०९ ©कवी - के. गणेश गझल
गझल #मराठीशायरी
read moreMeena Panchal
*गागालगालगागा गागालगालगागा* कशास आई देऊन जन्म मजला,कुढते कशास आई ? दिनरात्र नेत्र ओले,रडते कशास आई ? हाती तुझ्या न माझ्या,कन्या रुपात जगणे सांभाळण्या मला तू,डरते कशास आई ? मुलगी म्हणून मजला, झिडकारले कुणी जर दुःखात लाकडासम,जळते कशास आई ? स्त्री जन्म लाभणे हे,का ते तुझ्याच हाती ? करुनी जिवास कष्टी,ढळते कशास आई ? कर्तव्यदक्ष स्त्री तू,समजू नकोस अबला शब्दांत त्या जनांच्या,अडते कशास आई ? घेईन मी भरारी,गगनास पेलणारी कमजोर मग उगा तू,ठरते कशास आई ? जाणीव ह्या मनाला,साऱ्या तुझ्या ऋणांची होईन ढाल तेंव्हा,लढते कशास आई ? कमजोर बनवणारी, दुनिया असे विखारी लाथाड तू रुढींना,खचते कशास आई? *मीना पांचाळ* गझल
गझल
read moreप्रकाश साळवी
गीत गात चाललो !! वृत्त : चामर लगावली : गालगाल गालगाल गालगाल गालगा ------------------------- चांदण्यात मी मनात गात गीत चाललो पावसात या नभात भीतभीत चाललो ** रानगंध मंद धुंद पाय वाट रंगली घेत ऊन पावसात थेंब थेंब चाललो ** रीत भात साथ साथ देत घेत वागलो ओठ ओठ सावरून चालरीत चाललो ** जीवनात येतजात भेदभाव ये कधी अंतरात घेत घेत हारजीत चाललो ** चांद रात या मनात घेत घेत वाढलो माणसात जीवनात गंध धुंद चाललो ** प्रकाश साळवी दि. २९/०६/२०२० सकाळी : ११:४० गझल
गझल
read more